समीर वानखेडेंची दोन दिवस चौकशी

समीर वानखेडेंची दोन दिवस चौकशी

कार्डेलिया क्रुझवरील ड्रग्जप्रकरणी भारतीय महसूल सेवा अधिकारी समीर वानखेडे यांची दोन दिवस चौकशी करण्यात आली. याप्रकरणी तपासासाठी स्थापन करण्यात आलेल्या दक्षता समीतीने नवी दिल्लीत कार्यवाही केली असून दक्षता समिती लवकरच एनसीबी संचालकांना अहवाल सादर करणार आहे.

दक्षता समितीने समीर वानखेडे यांची शनिवारी १० तास चौकशी केली. त्यानंतर त्यांना दिल्लीतच थांबण्यास सांगण्यात आले. तर रविवारी पुन्हा त्यांची चौकशी करण्यात आली. दक्षता समितीचे प्रमुख व्ही.व्ही. सिंह यांनी यांनी समीर वानखेडे यांना प्रश्न विचारले. अटकेपासून लाचखोरीच्या आरोपांपर्यंतचे अनके प्रश्न त्यांना विचारणार आले. तर दक्षता समिती लवकरच हा अहवाल एनसीबी संचालकांना सादर करण्याची शक्यता आहे, असे सुत्रांनी सांगितले आहे.

क्रुझवरील ड्रग्जप्रकरणी समीर वानखेडे यांच्या पथकाने आर्यन खानसह आणखी काही जणांना अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी अटक केली होती. याप्रकरणी लाचखोरीचा आरोप झाला. त्यामुळे एनसीबी मुख्यालयाने समीर वानखेडे यांच्याकडून हा तपास काढून या तपासासाठी दक्षता समितीची स्थापना करण्यात आली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version