Akola: दसऱ्यादिवशी ‘या’ गावात होते रावणाची पूजा, 350 वर्षे जुनी प्रथा

अकोला जिल्ह्यातलील एका गावात या दिवशी अनोखी प्रथा आहे. अकोल्यातील सांगोळा असे या गावाचे नाव आहे. जिथे या दिवशी रावणाची पूजा केली जाते.
Akola: दसऱ्यादिवशी ‘या’ गावात होते रावणाची पूजा, 350 वर्षे जुनी प्रथा

Ravana Mahapuja in Sangola: विजयादशमी म्हणजे सत्याचा असत्यावर विजयाचा दिवस होय. या दिवशी रामाने रावणाचा वध करून सत्यावर विजय मिळवला. विजयादशमी हा दिवस भारतात रावणरुपी पुतळ्याचे दहन करून साजरा करतात. मात्र अकोला जिल्ह्यातलील एका गावात या दिवशी अनोखी प्रथा आहे. अकोल्यातील सांगोळा असे या गावाचे नाव आहे. जिथे या दिवशी रावणाची पूजा केली जाते. संपूर्ण गाव या दिवशी रावणाची पूजा करायला एकत्र येते. आरती करण्यात येते. हार घालून विधिवत पूजा केली जाते. 

अकोला शहरापासून जवळपास 45 किलोमीटर अंतरावर हे सांगोळा गाव आहे. हजार ते दीड हजार लोकसंख्या असणारे हे सांगोळा गाव रावणाचं गाव म्हणून ओळखलं जातं. या गावामध्ये प्रवेश केल्याबरोबर डाव्या बाजूला ओट्याच्या चौथाऱ्यावर काळ्या पाषाणाची भव्य मूर्ती दिसते. तीच दशमुखी रावणाची मूर्ती आहे. जवळपास 300 वर्षांपूर्वी याठिकाणी रावणाच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. या मूर्तीला दहा तोंडं आहेत. दहा तोंडाच्या मस्तकावर मुकुट आहेत. हातामध्ये तलवार आहे. मूर्तीच्या इतर भुजांमध्ये आणखी शस्त्रं आहेत. मूर्ती युद्ध पेहरावात आहे. नेमकी रावणाची मूर्ती याठिकाणी कशी आली याची इतिहासामध्ये नोंद नाही. परंतु मूर्ती इथे कशी आली याविषयी वेगवेगळ्या आख्यायिका आहेत. 

हेही वाचा: Shirdi Sai Baba Punyatithi 2025 : शिर्डीत साईबाबांचा 107 वा पुण्यतिथी उत्सव भक्तिमय वातावरणात सुरू; संस्थानाकडून पूरग्रस्तांना 5 कोटी

काय आहे आख्यायिका?

सांगोळाा गावात रावणाची पूजा करण्यामागे एक कथा सांगितली जाते. सांगोळा गावातील ग्रामदैवतेसमोर झाडाची दगडी मूर्ती तयार करण्यास नागरिकांनी शिल्पकाराला सांगितलं होतं. मुर्तीकाराने मूर्ती घडवली. पण शिल्पकाराकडून 10 तोंडी रावणाची प्रतिकृती तयार झाली. सांगितल्यासारखी मूर्ती तयार झाली नसल्याने गावकरी शिल्पकारावर नाराज झाले. बैलगाडीवर मूर्तीला घेऊन ते गावामध्ये आले. गावाची हद्द सुरु होताच बैल थांबले. कुठल्याच परिस्थितीत बैल गावामध्ये प्रवेश करत नव्हते. शेवटी गावकऱ्यांना गावाच्या वेशीवरच नारळ फोडून मूर्तीची स्थापना करावी लागली. गावात हनुमानाचं मंदिर असल्याने ही मूर्ती गावात गेली नसावी, अशी गावकाऱ्यांकडून मूर्तीची आख्यायिका सांगितली जाते. दहा तोंडी रावण पाषाणातील मूर्तीची गावातील एक पुजारी दररोज पूजा करतो. पण दसऱ्याला संपूर्ण गाव रावणाची पूजा करायला एकत्र येतात. 

महादेवाची पूजा करणारा रावण हा दृष्ट प्रवृत्तीचा नव्हता असं गावकऱ्यांचं मत आहे. पूर्वापार चालत आलेली आणि पूर्वजांनी सांगितल्याप्रमाणे आजही या गावात रावणाची पूजा केली जाते. ही परंपरा निरंतर सुरूच राहील असा विश्वास गावकऱ्यांना आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version