Shirdi Saibaba Guru Purnima : 1 कोटींचे सुवर्ण मुकुट, 51 ग्रॅमचं ‘ॐ’…, गुरूपौर्णिमेनिमित्त शिर्डीच्या साईचरणी कोट्यवधींची गुरूदक्षिणा अर्पण

गुरुपौर्णिमा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शिर्डीत भाविकांचा उत्साह ओसंडून वाहत आहे. अशातच गुरूपौर्णिमा उत्सवाच्या पहिल्याच दिवशी शिर्डीच्या साईचरणी कोट्यवधींची गुरूदक्षिणा अर्पण करण्यात आली आहे.
Shirdi Saibaba Guru Purnima : 1 कोटींचे सुवर्ण मुकुट, 51 ग्रॅमचं ‘ॐ’…, गुरूपौर्णिमेनिमित्त शिर्डीच्या साईचरणी कोट्यवधींची गुरूदक्षिणा अर्पण

एकीकडे आषाढी वारीनंतर वारकरी विठुरायाच्या दर्शनाने तृप्त होऊन माघारी परतत असताना, दुसरीकडे गुरुपौर्णिमा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शिर्डीत भाविकांचा उत्साह ओसंडून वाहत आहे. गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त शिर्डीतील साईनगरी भाविकांच्या गर्दीने आणि उत्साहाने गजबजली आहे. आजपासून सुरु झालेल्या तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवासाठी देशभरातून साईभक्त मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. उद्या गुरुपौर्णिमेचा मुख्य दिवस असल्याने राज्यभरातून विविध पायी पालख्या साईनामाचा जयघोष करत शिर्डीत दाखल होत आहेत. 

याच पार्श्वभूमीवर गुरूपौर्णिमा उत्सवाच्या पहिल्याच दिवशी शिर्डीच्या साईचरणी कोट्यवधींची गुरूदक्षिणा अर्पण करण्यात आली आहे. आंध्र प्रदेशातील वेल्लूर येथील साईभक्त श्रीनिवास राव यांनी तब्बल 642 ग्रॅम वजनाचा आणि एक कोटी तीन लाख रुपये किमतीचा सोन्याचा मुकूट साईबाबांना अर्पण केला आहे. या मुकुटावर नवग्रहांची प्रतिकृती आणि अमेरिकन डायमंडची आकर्षक जडणघडण करण्यात आली आहे. उद्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी हा मुकुट साईबाबांच्या डोक्यावर परिधान केला जाईल.

हेही वाचा- Char Dham Yatra Suspended: केदारनाथ-बद्रीनाथ मार्गावर दरड कोसळण्याचा धोका; चार धाम यात्रा 2 दिवसांसाठी बंद, पुढील 15 तास अतिवृष्टीचा इशारा

तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाच्या पहिल्याच दिवशी साईंच्या झोळीत सोनेरी गुरुदक्षिणा आली असून एक कोटी रुपयांच्या पाठोपाठ जबलपूर येथील अशोक कुमार शर्मा या माजी सैनिकाने देखील साईंच्या झोळीत 60 ग्राम सोने वजनाचा मुकुट अर्पण केला. साडे आठ लाख रुपये किंमत असलेला हा मुकुट शर्मा यांनी साईबाबा संस्थानकडे सुपूर्द केला आहे. यावेळी शर्मा साईंच्या प्रती मनोगत व्यक्त करताना भावुक झाल्याचे दिसून आले. 

तसेच बडोदा येथील निस्सिम साईभक्त विजय नाईक यांनी देखील साईंच्या झोळीत सोन्याचा 51 ग्रॅम वजनाचा साडे आठ लाख रुपये किंमत असलेला हा ओम विजय नाईक यांनी साईबाबा संस्थानकडे सुपूर्द केलाय.. यावेळी नाईक यांनी माध्यमांशी बोलतांना प्रतिक्रिया दिली की मृत्यू अटळ वाटत होता पण श्री साईबाबांच्या कृपाशीर्वादाने नवजीवन मिळालं.माझ्यावर साईबाबांचे कोटी कोटी उपकार आहेत, म्हणून मी गुरुपौर्णिमा उत्सवानिम्मित छोट्या स्वरूपाचे दान म्हणून मी ओम गुरुदक्षिणा म्हणून साईंच्या दानपेटीत अर्पण केल्याची प्रतिक्रिया देणगीदार साईभक्त विजय नाईक यांनी दिली. दरम्यान साईनगरीत सध्या भक्तीचे वातावरण आणि अभूतपूर्व उत्साह पाहायला मिळत आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version