शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडूंना दोन महिने सश्रम कारावास

शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडूंना दोन महिने सश्रम कारावास

महाविकास आघाडीमधील नेते आणि शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना अमरावतीच्या चांदूरबाजार न्यायालयाने दोन महिन्यांचा सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

२०१४च्या विधानसभा निवडणुकीमध्ये मुंबईतील मालमत्तेची माहिती लपवल्याप्रकरणी बच्चू कडू यांना दोन महिन्यांचा सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. अमरावतीच्या चांदूरबाजार न्यायालयाने बच्चू कडूंना शिक्षा सुनावली आहे. तसेच शिक्षेसोबत बच्चू कडूंना न्यायालयाने त्यांना २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

२०१४च्या विधानसभा निवडणूकीत बच्चू कडू अचलपूर मतदारसंघातून विजयी झाले होते. मात्र, या निवडणुकीसाठीच्या उमेदवाराच्या शपथपत्रात त्यांनी मुंबईतील मालमत्तेची माहिती दिली नाही. याप्रकरणी चांदूरबाजारचे भाजप नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी आरोप करत २०१७मध्ये तक्रार दाखल केली होती. बच्चू कडू यांच्याविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर चार वर्षांनी या प्रकरणाचा निकाल अमरावतीच्या चांदूरबाजार न्यायालयाने निकाल जाहीर केला आहे. लोकप्रतिनिधी कायद्यान्वये बच्चू कडू यांच्यावरील गुन्हा सिद्ध झाला असून त्यांच्यावर कारवाईचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version