‘मगोपचं भाजपाला समर्थन’ – देवेंद्र फडणवीस

‘मगोपचं भाजपाला समर्थन’ – देवेंद्र फडणवीस

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत विजयी झाले आहेत. साखळी मतदार संघातून प्रमोद सावंत ५०० मतांनी विजयी झाले आहेत. दरम्यान, भाजप नेते आणि गोवा भाजपा प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत गोव्याच्या जनेतेचे आभार मानले आहेत. गोव्याच्या जनतेचा भाजपाला पाठिंबा असल्याचेही ते म्हणाले आहेत.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, गोव्यात भाजपाला दणदणीत विजय मिळाला असून मगोपचे भाजपाला समर्थन असल्याचे ते म्हणाले. तसेच गोव्यात २५ आमदारांच्या समर्थनात भाजपा सरकार स्थापन करणार असल्याची माहिती फडणवीसांनी दिली आहे.

‘भाजपाला जनतेचा आशिर्वाद’ – प्रमोद सावंत

गोव्यात भाजपच्या विजयानंतर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी जल्लोष साजरा केला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री सावंत यांनी जनतेचे आभार मानले आहेत. भाजपाला जनतेचा आर्शीर्वाद असल्याचे प्रमोद सावंत म्हणाले आहेत. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपला विजय मिळाला असल्याचे मुख्यमंत्री सावंत म्हणाले. तर भाजपाचे नेते आणि गोव्याचे प्रभारी देवेंद्र फडणवीस यांच्या विजयामुळे गोव्यात भाजपाला विजय सोपा झाला असल्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version