‘घाबरू नका, आम्ही तुम्हाला सुखरूप बाहेर काढू’ – व्ही. के. सिंह

‘घाबरू नका, आम्ही तुम्हाला सुखरूप बाहेर काढू’ – व्ही. के. सिंह

रशिया-युक्रेन युद्धात अनेक भारतीय रहिवासी युक्रेनमध्ये अडकले आहेत. युक्रेनमध्ये अडकलेल्या भरातीय रहिवाश्यांना पोलंडकडून मदतीचा हात सरसावला आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्री व्ही. के. सिंह पोलंडमध्ये दाखल झाले आहेत. त्यांनी पोलंडमध्ये असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांची चर्चा केली असून त्यांना सुखरुप मायदेशी नेणार असल्याचे आश्वासनही त्यांनी विद्यार्थ्यांना दिले आहे.

केंद्रीय मंत्री व्ही. के, सिंह यांनी ट्विट केले की, विद्यार्थ्यांनी घाबरून जाऊ नये. आम्ही त्यांना सुखरुप बाहेर काढू, असे आश्वासन त्यांनी ट्विटरद्वारे विद्यार्थ्यांना दिले आहे. दरम्यान, आज व्ही. के. सिंह पोलंडमध्ये दाखल झाले असून त्यांनी पोलंडमधील गुरुद्वारात ८० भारतीय विद्यार्थ्यांची भेट घेतली. तसेच वॉर्सा येथे जाऊन विद्यार्थ्यांची चर्चा केली.

युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना पोलंडने मदत केली असून भारतात येण्याची व्यवस्था होईपर्यंत भारतीय विद्यार्थी पोलंडमध्ये आश्रय घेऊ शकतात. तसेच पोलंडने अडकलेल्या भारतीयांसाठी अन्न, निवाऱ्याची व्यवस्था केली आहे.

काय आहे पोलंडची मदत?

युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना पोलंडची मदत.

भारतीय विद्यार्थ्यांसाठी निवारा.

युक्रेनमधून पोलंडमध्ये प्रवेश करणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी अन्न, निवाऱ्याची व्यवस्था.

भारतासाठी उड्डाणे आयोजित होईपर्यंत पोलंडमध्ये राहतील.

भारतात येण्याची व्यवस्था होईपर्यंत आश्रय घेवू शकतात.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version