बंडातात्या कराडकरांवर गुन्हा दाखल

बंडातात्या कराडकरांवर गुन्हा दाखल

किराणा दुकानात वाईन विकण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावरून महिला नेत्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य तसेच विनापरवाना जमाव जमवून आंदोलन केल्याप्रकरणी बंडातात्या कराडकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हरी भक्त परायण बंडातात्या कराडकर यांच्यावर सातारा पोलिसांनी कारवाई केली आहे.

सातारा शहर पोलिसांनी बंडातात्या कराडकरांसह १२५ वारकऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम २६९, २७०, १८८, ३७(१)(३), १३५नुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती सातारा पोलिसांनी दिली आहे.

बंडातात्या कराडकर काय म्हणाले?

साताऱ्यामध्ये बंडातात्या कराडकर यांच्या नेतृत्वाखाली व्यसनमुक्ती संघटनेचे दंडवत आणि दंडूका आंदोलन करण्यात आले. तसेच यावेळी राज्यातील सर्व नेत्यांची मुले दारू पितात, असा आरोप बंडातात्या कराडकर यांनी केला. बंडातात्या यांनी केलेल्या या आरोपामुळे त्यांच्यावर टीका करण्यात येत असून सातारा पोलिसांनी बंडातात्यांवर गुन्हा दाखल केला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version