Adhik Maas Ekadashi 2026 : 3 वर्षांतून येणाऱ्या ‘अधिक मासातील’ दोन एकादशींमुळे मिळते महापुण्य; जाणून घ्या तिथी, महत्त्व आणि उपवास सोडण्याची वेळ

धार्मिक ग्रंथांनुसार, अधिक मासातील एकादशीचे व्रत पाळल्याने सामान्य दिवसांच्या तुलनेत कैक पटीने अधिक पुण्य प्राप्त होते.
Adhik Maas Ekadashi 2026 : 3 वर्षांतून येणाऱ्या ‘अधिक मासातील’ दोन एकादशींमुळे मिळते महापुण्य; जाणून घ्या तिथी, महत्त्व आणि उपवास सोडण्याची वेळ

Adhik Maas Ekadashi 2026 : दर तीन वर्षांनी एकदाच येणारा अधिक मास, ज्याला 'पुरुषोत्तम मास' असेही संबोधले जाते, तो धार्मिक दृष्टिकोनातून अत्यंत पवित्र मानला जातो. या विशेष काळात येणाऱ्या दोन एकादशींचे महत्त्व अनन्यसाधारण असून, या तिथींची प्रतीक्षा भाविक आतुरतेने करत असतात. अधिक मासात येणाऱ्या या एकादशींचे व्रत केल्यास भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होऊन त्यांना अनेक जन्मांच्या पापांतून मुक्ती मिळते आणि मोक्षप्राप्तीचा मार्ग सुकर होतो, अशी श्रद्धा आहे.

अधिक मासातील विशेष एकादशींच्या तारखा
2026 सालातील अधिक मासात येणाऱ्या या दोन दुर्मिळ एकादशींची सविस्तर माहिती जाणून घेऊ..

– पद्मिनी एकादशी (शुक्ल पक्ष): यालाच 'कमला एकादशी' असेही म्हणतात. ही तिथी 27 मे 2026 रोजी साजरी केली जाईल. या एकादशीची सुरुवात 26 मे 2026 रोजी सकाळी 5:10 वाजता होऊन ती 27 मे 2026 रोजी सकाळी 6:21 वाजता समाप्त होईल. उपवास सोडण्यासाठी 28 मे 2026 रोजी सकाळी 5:25 ते 7:56 ही वेळ निश्चित करण्यात आली आहे.
– परम एकादशी (कृष्ण पक्ष): ही अधिक मासातील दुसरी महत्त्वाची एकादशी असून ती 11 जून 2026 रोजी येणार आहे. तिथीची सुरुवात 10 जून 2026 रोजी रात्री 12:57 वाजता होईल आणि ती 11 जून रोजी रात्री 10:36 वाजता संपन्न होईल. उपवासाची सांगता करण्याचा शुभ मुहूर्त 12 जून रोजी सकाळी 5:23 ते 8:10 या वेळेत आहे.

हेही वाचा – Adhik Maas 2026: विष्णुसहस्रनाम की पुरुषसूक्त? अधिक मासात कोणती स्तोत्र ऐकल्याने मिळेल विष्णूंची अफाट कृपा

अधिक मासातील व्रताचे महत्त्व
धार्मिक ग्रंथानुसार, अधिक मासातील एकादशीचे व्रत पाळल्याने सामान्य दिवसांच्या तुलनेत कैक पटीने 'अधिक पुण्य' प्राप्त होते. या एकादशी दुर्मीळ असल्याने त्यांचे महत्त्व अधिक वाढते. जे भक्त पूर्ण निष्ठेने आणि श्रद्धेने या दिवशी उपवास करतात, त्यांच्या जीवनातील अडचणी दूर होतात आणि आध्यात्मिक प्रगती साधली जाते. या काळात केलेली उपासना थेट भगवान विष्णूंना समर्पित मानली जाते, ज्यामुळे भक्तांना विशेष आशीर्वादाची प्राप्ती होते. या महिन्यात श्रीविष्णूसहस्रनाम आणि पुरूषसूक्त यांचे पठण अत्यंत लाभदायी मानले जाते.

या दुर्मिळ योगाचा लाभ घेण्यासाठी भाविकांनी दिलेल्या वेळेत उपवास आणि विधी पूर्ण करणे आवश्यक आहे. अधिक मासातील या दिवसांचे पालन केल्याने केवळ आर्थिक किंवा मानसिक शांती मिळण्यासह मोक्षाचा मार्गही मोकळा होतो असे मानले जाते. त्यामुळेच, दर तीन वर्षांनी येणाऱ्या या एकादशीच्या पर्वकाळात नामस्मरण, दानधर्म आणि व्रताचे विशेष महत्त्व आहे. अधिक मासामुळे या सर्वांचे अधिक फळ मिळते. या महिन्यात भगवंताच्या कोणत्याही मूर्तीची केवळ देव्हाऱ्यात ठेवून मनोभावे पूजन करण्याने प्रतिष्ठापना आपोआप संपन्न होते. यासाठी वेगळ्या पूजा-मंत्रांची आवश्यकता नसते.

हेही वाचा – Adhik Maas 2026: संकल्पपूर्तीचा ध्यास येई फळास! अधिक मासात श्री गुरुचरित्र ग्रंथातील 'हे' अध्याय वाचणे शुभफळदायी

(Disclaimer : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही.)

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version