यवतमाळमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी डॉ. अशोक पाल यांची हत्या करण्यात आली. त्यामुळे या घटनेचे पडसाद आता नागपूरमध्ये उमटत आहेत. आजपासून नागपूरमधील मेयो मेडिकलमधील निवासी डॉक्टरांनी ‘घर चलो अभियान’ सुरू केले असून अत्यावश्यक सेवा वगळता कामबंद आंदोलन पुकारले आहे.
यवतमाळमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ मेडिकलमधील निवासी डॉक्टरांनी डीन कार्यालयासमोर प्रदर्शन केले. जोवर डॉक्टरांच्या सुरक्षेला सरकार गांभीर्याने घेत नाही तोवर अशा घटना घडत राहतील. त्यामुळे यवतमाळ पोलिसांनी या घटनेचा तपास योग्य पद्धतीने करून आरोपीला अटक करण्याची मागणी या निवासी डॉक्टरांनी केली आहे.
डॉ. अशोक पाल हे एमबीबीएसच्या तिसऱ्या वर्षाचे शिक्षण घेत होते. १० नोव्हेंबर रोजी महाविद्यालयाच्या परिसरात त्यांचा मृतदेह आढळून आला. त्यामुळे या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी सर्व एमबीबीएस विद्यार्थ्यांनी संप पुकारला. तसेच या प्रकरणाचे पडसाद नागपूरमध्ये उमटले असून मेयो मेडिकलमधील निवासी डॉक्टरांनी ‘घर चलो अभियान’ सुरू केले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.