यवतमाळ जिल्ह्यात 64 जणांची कोरोनावर मात ; 32 नव्याने पॉझेटिव्ह

यवतमाळ जिल्ह्यात 64 जणांची कोरोनावर मात ; 32 नव्याने पॉझेटिव्ह

यवतमाळ, दि. 13 : वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 64 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर गत 24 तासात जिल्ह्यात 32 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहे.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार शुक्रवारी एकूण 365 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 32 जण नव्याने पॉझेटिव्ह तर 333 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले. जिल्ह्यात सद्यस्थितीत 311 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 10659 झाली आहे.

आज 64 जणांना सुट्टी मिळाल्याने सुरवातीपासून बरे झालेल्यांची एकूण संख्या 9869 आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 354 मृत्युची नोंद आहे. सुरवातीपासून आतापर्यंत 96565 नमुने पाठविले असून यापैकी 96417 प्राप्त तर 148 अप्राप्त आहेत. तसेच 85393 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version