यवतमाळ जिल्ह्यात 120 जण नव्याने पॉझेटिव्ह तर एकाचा मृत्यु ; 40 बरे

यवतमाळ जिल्ह्यात 120 जण नव्याने पॉझेटिव्ह तर एकाचा मृत्यु ; 40 बरे

यवतमाळ, दि. 25 : जिल्ह्यात 24 तासात 120 जण नव्याने पॉझेटिव्ह आले असून एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यु झाला. मृतकामध्ये घाटंजी तालुक्यातील 65 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 40 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार बुधवारी एकूण 1905 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 120 जण नव्याने पॉझेटिव्ह तर 1785 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. जिल्ह्यात सद्यस्थितीत 425 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 11235 झाली आहे.

24 तासात 40 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 10442 आहे. तर जिल्ह्यात एकूण 368 मृत्युची नोंद आहे. सुरवातीपासून आतापर्यंत 108306 नमुने पाठविले असून यापैकी 106998 प्राप्त तर 1308 अप्राप्त आहेत. तसेच 95763 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version