मनसे नेते संतोष धुरी यांनी नुकतीच पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. संतोष धुरी संदीप देशपांडे यांचे निकटवर्तीय असल्यामुळे संदीप देशपांडे देखील मनसेला रामराम ठोकणार का? अशा चर्चांना उधाण आले होते. मात्र या चर्चांना स्वत: संदीप देशपांडे यांनी पूर्णविराम देण्याचं म्हटलं आहे.
हेही वाचा- Uddhav-Raj Thackeray Interview: “ती एकच गोष्ट एकत्र येण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण” ‘सामना’च्या मुलाखतीत ठाकरे बंधूंनी रोखठोक सांगितले
यावेळी मनसे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी पत्रकार परिषद घेत म्हटले की, “काहींनी तर अशा बातम्या केल्या की, संदीप देशपांडे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश झाला, अशा ही काही बातम्या मी वाचल्या आहेत. काही लोकांनी असं ही चालवलं की, मला माध्यमांशी बोलायला बंदी घातली आहे. असा कुठलाही विषय नाही, मी मनसेमध्येच आहे, माझ्या पक्षाचं मी प्रामाणिकपणे काम करतोय. मला असं वाटत की, या सगळ्या चर्चांना पूर्णविराम देणे गरजेचे होते. संतोष धुरी काय बोलतोय याच्यावर मी बोलणे जरुरी नाही. त्याच्या दृष्टिकोनातून तो बोलतो, मी माझा दृष्टिकोनातून बोलतो. तो चुकीचा की बरोबर आहे हा येणारा काळ ठरवेल. माझा दृष्टिकोन तसा नाही”.
“ज्यावेळी मला 2012 ला तिकीट दिले त्यावेळी अनेक इच्छुक होते. त्यावेळी सगळ्यांना डावलून तिकीट दिलं. हा पक्षाचा निर्णय आहे आपल्याला मान्य करावा लागेल. युती म्हटल्यानंतर जागा वाटप होत शंभर टक्के समाधानी कोणीच असत असं नाही. प्रोसिजरचा भाग आहे. समजवणं सुरू आहे त्या नाराज लोकांना. जी चर्चा व्हायची ती होऊन गेली आता त्यावर चर्चा करून काय फायदा नाही. वायफळ चर्चेत कोणी पडू नये. येणाऱ्या निवडणुकीत जास्तीत जास्त उमेदवार निवडून येतात ते पाहणार आहे”.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.