Abhijit Deepke : विद्यार्थ्यांवरील क्रूर लाठीचार्जबद्दल पंतप्रधान मोदी माफी मागतील का?; अभिजीत दीपकेंचे मोदींच्या इंस्टा व्हिडीओबाबत सूचक वक्तव्य

Abhijit Deepke : विद्यार्थ्यांवरील क्रूर लाठीचार्जबद्दल पंतप्रधान मोदी माफी मागतील का?; अभिजीत दीपकेंचे मोदींच्या इंस्टा व्हिडीओबाबत सूचक वक्तव्य

छत्रपती संभाजीनगर : सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी नुकतेच एक्सवर व्हिडीओ पोस्ट करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इंस्टाग्राम व्हिडीओबाबत सूचक वक्तव्य केले आहे. पंतप्रधान मोदी आज रात्री पुन्हा आपला व्हिडीओ शेअर करतील आणि जंतर मंतरवरील विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या लाठीचार्जसाठी त्यांची क्षमा मागतील, अशी अपेक्षा दीपके यांनी व्यक्त केली आहे. अभिजीत दीपके म्हणाले की, आपण सर्वांनी पाहिले, काल रात्री मोदी यांनी व्हिडीओ शेअर करत विद्यार्थ्यांना आपण माफ करत असल्याचे म्हटले. मात्र आज रात्री मोदी अजून एक व्हिडीओ शेअर करतील. त्यात ते विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जसाठी माफी मागतील. जिथे मुलींचे कपडे फाडले गेले, त्यांच्यावर लाठीचार्ज केला गेला, त्यांना पोलिसांनी क्रूरपणे मारले, यासाठी ते माफी मागतील, अशी अपेक्षा आहे, असे अभिजीतने म्हटले आहे. 

हेही वाचा : MNS Internal Conflict: राज ठाकरेंच्या मनसेला मोठं भगदाड; संपर्क अध्यक्षांसह अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांचा पक्षाला रामराम

दिल्लीतर जंतर मंतरवर सीजेपच्या आंदोलनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंस्टाग्रामद्वारे व्हिडीओ शेअर करत तरुणांशी संवाद साधण्यास सुरूवात केली आहे. २३ जुलै रोजी पहिला व्हिडीओ शेअर केल्यानंतर काल, ३१ जुलै रोजी त्यांनी आपला पाचवा व्हिडीओ इंस्टावर शेअर केला. त्यानंतर आज पुन्हा ते व्हिडीओ टाकतील, त्यात ते काय म्हणतील, अशी अपेक्षा अभिजीत दीपकेंनी व्यक्त केली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version