गेल्या काही दिवसांपूर्वी कॉक्रोज जनता पार्टी आणि विद्यार्थ्यांचे देशव्यापी आंदोलन सुरु असताना शरद पवार यांनी दिल्लीच्या संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. त्यानंतर प्रफुल पटेल आणि पार्थ पवार यांनी गेल्या आठवड्यात शरद पवार यांची भेट घेतली असल्याची माहिती समोर आली असून या भेटीत तिन्ही नेत्यांची राजकीय चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे. या भेटीनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या पुन्हा एकदा चर्चा रंगल्या आहेत.
अशातच शरद पवार हे आज पुण्यावरून बारामतीच्या दौऱ्यावर आले आहेत त्यांची विद्या प्रतिष्ठान येथील कॅम्पस मध्ये नेहमीप्रमाणे असलेले शैक्षणिक बैठक संपन्न होणार आहे. या बैठकीला जात असताना खुप दिवसातून भेटलेल्या जुन्या सहकाऱ्याला ओळख देत जेष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी आप्पासाहेब धोंडे यांना थांबून तब्येतीची विचारपूस केली. तसेच यावेळी त्यांनी प्रफुल पटेल आणि पार्थ पवार यांच्यासोबत झालेल्या भेटीगाठींनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? यावर प्रतिक्रिया दिली.
यावेळी ते म्हणाले की, ‘महाराष्ट्र सरकारने आम्हाला सांगितले स्टेप बाय स्टेप आम्ही याद्या जाहीर करू आम्ही पंधरा दिवस अजून वाट बघू…दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा काही संबंध नाही..’ असं म्हणत शरद पवार यांनी एका वाक्यात उत्तर देऊन हा विषय संपवला आहे. तर नीट पेपरफुटी प्रकरणी विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया देत म्हटलं की, माझी जी काही चर्चा झाली त्यातून मार्ग निघेल. असं त्यांनी स्पष्ट केलं.
पार्थ अन् प्रफुल्ल पटेल शरद पवारांच्या भेटीला
गेल्या काही दिवसांपूर्वी कॉक्रोज जनता पार्टी आणि विद्यार्थ्यांचे देशव्यापी आंदोलन सुरु असताना शरद पवार यांनी दिल्लीच्या संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. दरम्यान दिल्लीत एक महत्त्वाची घडामोड घडल्याची माहिती समोर आली आहे. प्रफुल पटेल आणि पार्थ पवार यांनी गेल्या आठवड्यात शरद पवार यांची भेट घेतली असल्याची माहिती समोर आली असून या भेटीत तिन्ही नेत्यांची राजकीय चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे.
या भेटीनंतर दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार अशा चर्चांना उधाण आलं आहे. एकीकडे मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी पवार पक्ष एनडीएसोबत जाण्याच्या तयारीत असल्याचे म्हटले जात आहे, तर दुसरीकडे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीला अजित पवारांच्या राष्ट्रवादीत विलीन होऊनच एनडीएमध्ये येण्याची अट घातल्याचेही समोर आले आहे. मात्र शरद पवार यांनी अत्यंत मोजक्या शब्दात उत्तर देऊन हा विषयच संपवल्याचं बोललं जात आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.