उदयनराजेंशी वाद म्हणून शिवेंद्रराजे भाजपात?

उदयनराजेंशी वाद म्हणून शिवेंद्रराजे भाजपात?

माझ्या मतदार संघातील कुरघुड्या बद्दल उदयनराजेंना समोर घेऊन वाद मिटवतो असे शरद पवारांनी भेटीत सांगितले होते मात्र पवारांनी सांगूनही या कुरघुड्या थांबणा-या नव्हत्या. त्यामुळेच मी राष्ट्रवादीला रामराम ठोकल्याचं मत माजी आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.
शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेवून शिवेंद्रराजे भोसले पक्ष सोडणार नाहूी. असं सांगितलं होतं परंतू तरीही त्यांनी पक्षांतर केल्याने राष्ट्रवादीला याचा फटका बसल्याची चर्चा होती. शिवेंद्रराजे यांनी पत्रकार परिषद घेवून खुलासा केला आहे.

काय म्हणाले शिवेंद्रराजे?

माझ्या मतदार संघातील कुरघुड्या बद्दल उदयनराजेंना समोर घेऊन वाद मिटवतो असे शरद पवारांनी भेटीत सांगितले होते मात्र पवारांनी सांगूनही या कुरघुड्या थांबणा-या नव्हत्या.

त्यामुळेच मी राष्ट्रवादीला रामराम ठोकल्याचं मत माजी आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.

सत्तेशिवाय राहता येत नाही म्हणून शिवेंद्रसह इतर आमदार हे भाजपमध्ये गेल्याच मत शरद पवारांनी आज पत्रकार परिषदेत व्यक्त केल्यानंतर शिवेंद्रराजेंनी यावर पत्रकार परिषद घेऊन शरद पवारांना उत्तर दिल.

हे सांगत असताना त्यांनी माझ्याच पक्षात जर या कुरघोड्यांमुळे दगाफटका झाला तर आणि मला सत्तेपासून दुर रहावे लागले तर मला कोणताही पक्ष विचारणार नाहीच शिवाय कार्येकर्तेही विचारणार नाहीत.

त्यामुळे मी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला असे सांगत असतानाच त्यांनी अडथळा करणा-यांचा मी काट्याने काटा काढणार असल्याचंही खुल आवाहन त्यांनी दिलं.

यावेळी त्यांनी प्रतिस्पर्धी राजघराण्यातला असो वा कोणीही मी माझ्यापध्दतीने लढणार असल्याच त्यांनी सांगितले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version