‘निर्बंध फक्त सणांवरच का?’ – आशिष शेलार

‘निर्बंध फक्त सणांवरच का?’ – आशिष शेलार

राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट झाल्यामुळे राज्य सरकारने कोरोना निर्बंध शिथिल केले आहेत. मात्र, होळी, धुलिवंदनासाठी राज्य सरकारने नियमावली जाहीर केली आहे. तसेच राज्य सरकारचे हे नियम पाळणे बंधनकारक असल्याचे गृहमंत्रालयाने सांगितले आहे. मात्र, राज्य सरकारने सादर केलेल्या नियमावलीवर विरोधी पक्षाने टीका केली आहे.

निर्बंध फक्त सणांवरच का? असा सवाल भाजप नेते आशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे. सणासुदीच्या दिवसांत राज्य सरकारने नियमावली जाहीर केली आहे. त्यामुळे विरोधी पक्षाने राज्य सरकारवर टीका केली आहे. तसेच विरोधकांच्या टीकेला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. राज्य सरकारने राज्याच्या हितासाठी नियम बनवले असल्याचे संजय राऊत म्हणाल आहेत.

काय आहेत नियम?

  • रात्री दहाच्या आत होळीच दहन करावे लागणार.
  • होळी साजरी करताना डीजे लावण्यास बंदी.
  • दहावी आणि बारावीच्या परीक्षेमुळे नियमावली जारी.
  • मद्यपान करून बीभस्त वर्तन केल्यास कारवाई करणार.
  • धार्मिक भावना न दुखावण्याच्या सूचना.
  •  जबरदस्तीने रंग लावण्यास मनाई.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version