नितेश राणे आणि अबू आझमी विधानसभेत भिडले

नितेश राणे आणि अबू आझमी विधानसभेत भिडले

औरंगजेबच्या स्टेटसचा मुद्दा भाजप आमदार नितेश राणे यांनी विधानसभेत उपस्थित करत आक्रमक झाले. या मुद्यावरून नितेश राणे आणि समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी सभागृहात भिडले. छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराजांच्या राज्यात औरंगजेबाचं स्टेटस ठेवलं जातं. ज्या औरंग्याने छत्रपती शिवराय, धर्मवीर संभाजी महाराजांविरुद्ध कटकारस्थान केलं, जो स्वराज्याचा एक नंबरचा शत्रू होता. त्या औरंग्याचं स्टेटस ठेवून राज्यातील वातावरण खराब केलं जातय, असं आमदार नितेश राणे म्हणाले.

अशा पद्धतीच्या अनेक प्रकरणांवर पोलिसांनी कारवाया केल्या आहेत. आपल्या राज्यात अशी लोकं आहेत की, जे वंदे मातरम म्हणत नाही, पण मिरवणूक काढली जाते, तेव्हा सर तनसे जुदा, औरंग्या माझा बाप आहे, असे सांगणार काही लोक आहेत. यांना राज्यात ठेवायच की, नाही ते ठरवा. हे गद्दार आहेत. मुद्दाम ते हे बोलतायत. महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यात या गोष्टी चालल्या आहेत, असं नितेश राणे म्हणाले.

वंदे मातरम म्हणत नाहीत, पण जिल्ह्या, जिल्ह्यात सर तनसे जुदा, औरंग्या बाप आहे अशा घोषणा देऊन राज्यातील वातावरण खराब केलं जातय. यांना शिवरायांच्या राज्यात राहण्याचा अधिकार नाही. पाकिस्तानात निघून जा. कशाला येथे राहता? अशी भाषा नितेश राणे यांनी वापरली. आपले गृहमंत्री शिवभक्त आहेत. प्रत्येक भाषणा अगोदर ते शिवरायांचं नाव घेतल्याशिवाय भाषण सुरु करत नाहीत. आमच्या शिवरायांच्या राज्यात कायदा-सुव्यवस्था महत्त्वाची आहे. हे औरंग्याचं स्टेटस ठेवणारी जी मुलं आहेत, त्या मागचा मास्टर माइंड शोधण्यासाठी SIT स्थापन करा, अशी मागणी नितेश राणे यांनी केली.

नितेश राणे यांच्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी म्हणाले की, काही मुस्लिम तरुणांनी स्टेटस ठेवले. त्यानंतर तुम्ही त्यांच्यावर कारवाई केली. जेव्हा प्रकाश आंबेडकरांनी औरंगजेबच्या कबरीवर फुलं वाहिली आणि कोणामध्ये हिंमत असेल तर माझ्यावर केस करून दाखवा, असंही आंबेडकर म्हणाले. देशात दोन प्रकारचे कायदे आहेत का? ज्यांनी स्टेटस ठेवलं त्यांच्यावर गु्न्हे दाखल केले आणि आंबेडकरांनी आव्हान दिलं. तरीही त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही. ट्रेनमध्ये घटना याच कारणामुळे घडली. ज्याप्रकारे द्वेष पसरवण्याचं काम सुरू आहे. हे काम 24 तास सुरू राहतं. मुस्लिमांना हिंदूंविरोधात बदनाम करण्याचं काम केलं जातय. हे लोकं मला गद्दार म्हणतात. गांधींच्या आरोपीचं प्रचार केलं जातंय. हे सगळं मुद्दाम केलं जातंय. हे लोकं देशाचं वातावरण खराब करताहेत, असं आमदार अबू आझमी म्हणाले.

दरम्यान, लव्ह जिहादच्या मुद्यावरून सुद्धा भाजपा आमदार नितेश राणे आणि समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांच्यामध्ये सभागृहात जुंपली होती.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version