‘वाईनचा निर्णय कुणाच्या फायद्यासाठी?’ – देवेंद्र फडणवीस

‘वाईनचा निर्णय कुणाच्या फायद्यासाठी?’ – देवेंद्र फडणवीस

किराणा दुकानात ग्राहकांसाठी अत्यावश्यक गोष्टी मिळतात, मात्र आता किराणा दुकान, सुपर मार्केटमध्ये वाईनची विक्री होणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मात्र, मविआच्या या नव्या निर्णयावर विरोधकांनी टीका केली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मविआ सरकारवर निशाणा साधला आहे. वाईनचा निर्णय कुणाच्या फायद्यासाठी? असा सवाल देवेंद्र फडणवीसांनी मविआ सरकारला विचारला आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, किराणा दुकानात वाईन विक्रीचा निर्णय शेतकऱ्यांचा हिताचा असल्याची भूमिका मविआ सरकारने घेतली आहे. मात्र, हा निर्णय शेतकऱ्यांचा हिताचा नाही. काही लोकांनी नव्याने दारूच्या कंपन्या, एजन्सी घेतल्या आहेत. अशा लोकांसाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे फडणवीस म्हणाले.

महाराष्ट्राला ‘मद्यराष्ट्र’ बनविण्यासाठी नेमकी कोणाची बैठक झाली, तसेच ही बैठक कुठे झाली? विदेशात झाली का? असा सवालही फडणवीसांनी विचारला आहे. तसेच मविआच्या या निर्णयाच्या मागे मोठे अर्थकारण असल्याचा आरोपही देवेंद्र फडणवीसांनी केला आहे. त्यामुळे महाराष्ट्राला मद्यराष्ट्र बनवण्याचे राज्य सरकारचे स्वप्न दिसत आहे, याचा आम्ही निषेध करतो, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version