कोण आहे सुपेंचा पाठीराखा?

कोण आहे सुपेंचा पाठीराखा?

महाराष्ट्र राज्य परीक्षा विभागाचे अध्यक्ष तुकाराम सुपे यांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. शिक्षक पात्रता परिक्षा (टीईटी) परिक्षा घोटाळ्याप्रकरणी पुणे सायबर सेलने ही कारवाई केली असून या घोटाळ्यात अनेक मोठे अधिकारी असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

पेपरफुटी प्रकरणी काही जणांना अटक झाली असली तरी, याचे मुख्य सूत्रधार अजूनही पोलिसांपासून दूरच असल्याचे लक्षात आलेले आहे. त्यातच टीईटीच्या परीक्षेत घोटाळा असल्याचे समोर आले आहे. पोलिसांना तपासात ८८ लाख रुपये रोख आणि सोन्याचे दागिने हाती लागले आहेत. घोटाळा बहाद्दर परीक्षार्थींकडून पैसे घेऊन त्यांना पेपर न लिहिण्याचा सल्ला देत तसेच ज्यांनी परीक्षा दिली आहे त्यांनी उत्तरपत्रिका पुनर्तपासणीचा अर्ज करावा असे सुचवले जात असे.

यासाठी प्रत्येक परिक्षार्थीकडून ३५ हजार ते १ लाख रुपये ते घेतले जात असल्याचे तपासात समोर येत आहे. या सगळ्यातून साडेचार कोटी कमावल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून त्याचे धागेदोरे सुपे यांच्यापर्यंत पोहोचल्याचा तपास अधिकाऱ्यांनी दावा केला आहे.

आरोग्य भरती आणि म्हाडा पेपर फुटी प्रकरणात अटक आरोपी डॉ. प्रीतिश देशमुख यांचा घरी टीईटी परीक्षेची ओळखपत्र सापडल्यानंतर पुणे पोलिसांचा टीईटी परीक्षेचा घोटाळा शोधण्यासाठी तपास सुरू केला.

जानेवारी २०२०मध्ये टीईटीची परीक्षा झाली होती. एजंटच्या मदतीने परीक्षेतील परिक्षार्थींची माहिती मिळवून त्या परीक्षार्थींना पात्र करण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून कोटी रुपये जमाकरून आपापसांत वाटून घेतले असल्याचे चौकशीत कबुल करण्यात आले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version