‘त्या’ ठेवीदारांच्या मृत्यूला जबाबदार कोण?

‘त्या’ ठेवीदारांच्या मृत्यूला जबाबदार कोण?

पुण्यातील बांधकाम व्यावसायिक डी. एस.कुलकर्णी यांच्याकडे पैसे गुंतवणारे ठेवीदार आता आपले पैसे मिळावे म्हणून जिवाचा आकांत करत आहेत. राज्यभरातील सुमारे 18 ठेवीदारांचा गेल्या दोन वर्षांत विविध कारणांमुळे मृत्यू झाला आहे. मात्र डीएसकेकडून ठेवीदारांची फसवणूक झाली आहे आणि त्याच चिंतेमुळे ठेवीदारांचे मृत्यू झाल्याचा आरोप केला जातोय.

मृत्यू झालेल्यांपैकी काही ठेवीदार या प्रकरणांच्या सुनावणीवेळी न्यायालयातदेखील हजर राहत होते. तर आजारपण, मुला-मुलींचं लग्न, घराचं बांधकाम अशा विविध कारणांसाठी त्वरित पैसे मिळावेत म्हणून अनेकांची न्यायालयीन लढाई सुरूच आहे.

या प्रकरणात DSK, त्यांची पत्नी हेमंती, मुलगा शिरीष, भाऊ मकरंद, पुतणी, जावई, मेव्हणी यांच्यासह काही नातेवाईक आणि ‘बॅंक ऑफ महाराष्ट्र’च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली होती. त्यातून बॅंकेच्या अधिकाऱ्यांना या गुन्ह्यातून वगळण्यात आलं आहे.

 मुख्य आरोपींसह इतरांनी जामिनासाठी केलेला अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. डीएसके यांनी 35 हजार गुंतवणूकदार आणि बॅंकांची सुमारे जवळपास 3 हजार कोटी रुपयांची फसवणूक केली, असा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. गुंतवणूकदार मात्र पैसे मिळतील अशी आशेवर आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version