‘मला इंग्रजी येत नाही. मी इंग्रजीत बोललो तर जोक होतो’ अशी प्रांजळ कबूली दिली ती केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी. एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या इमारतीचं उद्घाटन करण्यासाठी रावसाहेब दानवे नाशिकला उपस्थित होते. यावेळी त्यांनी आपल्याला इंग्लिश येत नसल्याचं म्हटलं.
रविवारी भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे नाशिक दौऱ्यावर होते.
यावेळी एल.डी. पाटील इंग्रजी मीडियाम हायस्कूलच्या इमारतीच्या उद्घाटनाचा कार्यक्रम त्यांच्या हस्ते पार पडला.
यावेळी आपलं शिक्षण मराठी माध्यमातून झाल्याचं रावसाहेब दानवे यांनी सांगितलं. आमच्याकडे इंग्रजी शाळा नव्हत्या. त्यामुळे मी तोडकंमोडकं इंग्रजी बोलतो. मी इंग्रजी बोललो की जोक होतो असं यावेळी दानवे म्हणाले.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.