घराणेशाहीबद्दल काय म्हणाली स्टारकिड?

घराणेशाहीबद्दल काय म्हणाली स्टारकिड?

बॉलीवूड किड्स आणि त्यांचे बॉलीवूड पदार्पण हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. अलीकडच्या काळात बऱ्याच स्टार किड्सनी बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. त्यावेळी त्यांना चांगला तसेच वाईट प्रतिसाद देखील मिळाला. यात अभिनेत्री आलिया भट्ट, सारा अली खान, जान्हवी कपूर, वरुण धवन यांचा समावेश आहे.अनेकदा सेलिब्रिटी किड्स असल्यामुळे त्यांना टीकाचा सामना करावा लागतो. दरम्यान

‘जवानी जानेमन’ या सिनेमातून बॉलिवूड पदार्पण करणारी अभिनेत्री पूजा बेदी हिची मुलगी अलाया एफने हिने घराणेशाहीवर मोठं वक्तव्य केलं आहे. एका मुलाखतीत अलायाने, ‘लोक कायमच माझा नेपोकिड म्हणून उल्लेख करतात. पण मी एक सेलिब्रिटी किड असल्याने मला बॉलीवूड मध्ये काम करण्याची संधी जरी मिळाली असली तरी देखील मिळालेल्या संधीसोबत अनेक जबाबदाऱ्यांचा देखील मला सामना करावा लागतो. विशेषाधिकार मिळाल्यामुळे सुरुवातीला अनेक गोष्टी आपल्यासाठी सोप्या असतात हे जरी सत्य असले तरी या नाण्याची दुसरी बाजू सुद्धा आहे..’

पुढे अभिनेत्री म्हणाली,‘घराणेशाहीमुळे बॉलिवूडमध्ये संधी मिळू शकेत. पण यश तुमच्या मेहनतीवर आणि नशीबावर अवलंबून असतं. मी लोकांची विचारसरणी बदलू शकत नाही कारण माझी कौटुंबिक पार्श्वभूमी हि चित्रपट सृष्टीशी संबंधितच राहील. मी केवळ माझ्या कामात काही बदल घडवून आणू शकते. मुख्य म्हणजे माझे काम हेच माझ्यासाठी अधिक महत्त्वाचं आहे.’

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version