Weather Update : पुढील 24 तासांत पुन्हा एकदा येणार अस्मानी संकट, गारपीटीसह पुन्हा महाराष्ट्राला पाऊस झोडपणार

विजांचा कडकडाट आणि ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे. 
Weather Update : पुढील 24 तासांत पुन्हा एकदा येणार अस्मानी संकट, गारपीटीसह पुन्हा महाराष्ट्राला पाऊस झोडपणार

मार्च महिन्याचा शेवटचा दिवस अवकाळी पावसाचा राहणार आहे. राज्यातील 18 जिल्ह्यांना वादळी पावसाचा यलो अलर्ट तर 13 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे पुढील 24 तास धोक्याचे असणार आहेत.

पुणे, सातारा, सांगली आणि सोलापूरला अवकाळी पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर कोल्हापूरला यलो अलर्ट असेल. विजांचा कडकडाट आणि ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे. 

हेही वाचा – Share Market News : शेअर बाजारात मोठी घसरण; गुंतवणूकदारांचे 10 लाख कोटी स्वाहा, दलाल स्ट्रीटवर गोंधळाचे वातावरण 

कोकण विभागातील मुंबई आणि पालघरमध्ये हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि ठाण्याला अवकाळी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. विजांच्या  कडकडाटासह ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे.

हेही वाचा – 'Dhurandhar 2' च्या यशानंतर आदित्य धर- यामी गौतम बनलेत ‘पॉवर कपल’; पण आदित्यचे स्वप्न दिग्दर्शक बनण्याचे नसून हे होते 

छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड आणि हिंगोलीला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर नांदेड, लातूर आणि धाराशिवला यलो अलर्ट असेल. 31 मार्च रोजी राज्यातील बहुतांश भागात वादळी पावसाचा जोर राहणार असून गारपिटीची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे. हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यांनुसार पुढील काही दिवसही अशाच स्वरूपाचे वातावरण राहण्याची शक्यता आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version