शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादमध्ये तोफ धडाडली. औरंगाबादेत शिवसेनेच्या आजोजित सभेत उद्धव ठाकरेंनी अनेक विषयांवर भाष्य केले. तसेच विरोधकांवर निशाणा साधला. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी सभेत पाणी प्रश्नावर भाष्य केलं. पाणी योजनेचा पाठपुरावा करूच, अशी ग्वाही उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले, ‘मी प्रामाणिक आहे, पाणीप्रश्नाला सामोरे जातोय, कुठेही फसवेगिरी नाही. सभेला येताना प्रशासकीय अधिकारी भेटले. त्यावेळी माझ्या संभाजीनगरच्या लोकांना पाणी द्या, असे अधिकाऱ्यांना ठणकावून सांगितले असल्याचे ठाकेर म्हणाले.’
पाणी योजनेसाठी मी पैसे देण्याची व्यवस्था राज्य सरकारच्या वतीने देणार आहे. योजनेसाठी पैसे कमी पडू देणार नाही. हातात दांडा घ्या, आणि पाणी योजना राबवा, असे उद्धव ठाके म्हणाले. तसेच पाणी योजनेला विलंब झाला तर दया न दाखवता कंत्राटदाराला तुरुंगात टाका, असा आदेश उद्धव ठाकरे म्हणाले.
पुढे उद्धव ठाकरे म्हणाले, संभाजीनगरच्या पाण्यासाठी नाही तर सत्ता गेल्यामुळे आक्रोश वाढला आहे. यावेळी उद्धव ठाकरेंनी विरोधकांवर निशाणा साधला. तुमची सत्ता असताना संभाजीनगरला पाणी योजनेसाठी निधी का दिला नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. खोटे बोलणे हे आमच्या हिंदुत्वात नाही, असा टोला ठाकरेंनी विरोधकांना लगावला. तसेच आम्ही रस्त्यासाठी निधी दिला असून मागील तीन ते चार वर्षांपूर्वीचे रस्ते पाहा आणि आजचे रस्ते पाहा. रस्त्यांमध्ये बरीच सुधारणा असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.