वाझे आणि परमबीर तासभर भेटले?

वाझे आणि परमबीर तासभर भेटले?

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांनी दोघांनीही आज चांदिवाल आयोगासमोर सोमवारी हजरे लावली. दरम्यान सचिन वाझे आणि परमबीर सिंह यांच्या भेटीची चर्चा रंगली आहे.

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना चांदिवाल आयोगाने समन्स बजावले होते तसेच सचिन वाझे यांनाही बोलवण्यात आले होते. त्यावेळी परमबीर सिंह आणि सचिन वाझे हे दोघेही तासभर भेटले असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे याप्रकरणाचा तपास आता मुंबई पोलिसांकडून होणार आहे. या दोघांनाही भेटण्याची परवानगी कुणी दिली आणि त्यांच्या भेटीमध्ये नेमके काय घडले? असा सवाल आता उपस्थित झाला आहे. त्यामुळे याची चौकशी आता मुंबई पोलीस करणार आहेत.

परमबीर सिंह यांचा जामीनपात्र वॉरंट रद्द

सोमवारी माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह हे चांदीवाल आयोगासमोर हजर झाले. यावेळी चांदीवाल आयोगाने त्यांचा जामीनपात्र वॉरंट रद्द केला असून त्यांना १५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. तसेच यावेळी चांदीवाल आयोगासमोर जात असताना परमबीर सिंह आणि सचिन वाझे आमनेसामने आले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version