वांद्रे परिसरामध्ये शुक्रवारी ठणठणाट

वांद्रे पश्चिम (एच-पश्चिम) विभागात शुक्रवारी ३० ऑगस्टला जलवाहिनी दुरुस्ती आणि जोडणीचे काम केले जाणार आहे.
वांद्रे परिसरामध्ये शुक्रवारी ठणठणाट

मुंबई : वांद्रे पश्चिम (एच-पश्चिम) विभागात शुक्रवारी ३० ऑगस्टला जलवाहिनी दुरुस्ती आणि जोडणीचे काम केले जाणार आहे. त्यामुळे सकाळी १० वाजल्यापासून मध्यरात्री १२ वाजेपर्यंत काही भागांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. महापालिकेच्या एच पश्चिम विभागातील पाली हिल जलाशय १ ची जुनी, जीर्ण झालेली मुख्य जलवाहिनी बदलण्यात येणार आहे. तसेच, वांद्रे पश्चिम येथील आर. के. पाटकर मार्गावर रामदास नाईक मार्ग ते मार्ग क्रमांक ३२ दरम्यान नव्याने टाकलेली ७५० मिलिमीटर व्यासाची मुख्य जलवाहिनी कार्यान्वित करण्यात येणार आहे. ही दोन्ही कामे ३० ऑगस्टला सकाळी १० वाजेपासून मध्यरात्री १२ वाजेदरम्यान केली जाणार आहेत. या कामांमुळे एच पश्चिम विभागातील काही भागांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version