नाशिकच्या इगतपुरीतील शिदवाडी परिसरात पाणीटंचाई

नाशिकच्या इगतपुरीतील शिदवाडी परिसरात पाणीटंचाई

काही ठिकाणी अवकाळी पाऊस हजेरी लावत आहे. तर, काही ठिकाणी पाण्यासाठी अनेकांना वणवण करावी लागत आहे. नाशिकच्याही इगतपुरीतील शिदवाडी परिसरात पाणीटंचाई भासत आहे.

हंडाभर पाण्यासाठी आदिवासी पाड्यांवरील महिलांची धोकादायक कसरत करावी लागत आहे. नदीवर असलेल्या बंधाऱ्यावरून महिलांची जीवघेणी पायपीट होत आहे. हंडाभर पाण्यासाठी महिला रोज करतात धोकादायक प्रवास करत आहेत. काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील आदिवासी पाड्यांवर भीषण पाणीटंचाई भासत आहे. विहिरीतून पाणी काढण्यासाठी देखील सोय नसल्याने विहिरीवर थांबून महिलांना विहिरीतून पाणी काढावे लागत आहे. इगतपुरी तालुक्यात अनेक धरण असून देखील नागरिक पाण्यापासून वंचित आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version