Waris Pathan on Love Jihad : आता लग्नासाठी भाजपाची परवानगी घ्यावी लागणार का? वारिस पठाण यांचा सरकारला सवाल

शातच आता एमाआयएमचे वारीस पठाण यांनी भाष्य करत भाजपावर निशाणा साधला आहे. 
Waris Pathan on Love Jihad : आता लग्नासाठी भाजपाची परवानगी घ्यावी लागणार का? वारिस पठाण यांचा सरकारला सवाल

सध्या महाराष्ट्रात भिगवण प्रकरणाची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. या प्रकरणावरून राजकीय वर्तुळातदेखील मोठ्या प्रमाणत मतंमतांतरं समोर येत आहेत. अशातच आता एमाआयएमचे नेते वारिस पठाण यांनी भाष्य करत भाजपावर निशाणा साधला आहे. 

ते म्हणाले की, “देशभरात अनेक आंतरजातीय विवाह होतात. अनेकांनी विविध जातीधर्मातील लोकांशी विवाह केला आहे. अनेक कलाकार इतर जातीतील, धर्मातील व्यक्तीशी विवाह करून खूश आहेत. इतकच काय तर भाजपाच्या होऊन गेलेल्या काही मंत्र्यांनीदेखील नॉनमुसलमान महिलेशी विवाह केला आहे. हे आधीपासून होत आलं आहे. याला भाजपवाल्यांनी लव्ह जिहादचं नाव देऊ नये. आता हिंदू-मुसलमानाला लग्न करायचं असेल तर भाजपाची परवानगी घ्यायची का? असा प्रश्न वारिस पठाण यांनी उपस्थित केला आहे. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version