महाराष्ट्रात ९.६३ कोटी मतदार

महाराष्ट्रात ३६ जिल्हे आणि विधानसभेचे २८८ मतदारसंघ आहेत. राज्यात एकूण ९ कोटी ६३ लाख मतदार आहेत.
महाराष्ट्रात ९.६३ कोटी मतदार

मुंबई : महाराष्ट्रात ३६ जिल्हे आणि विधानसभेचे २८८ मतदारसंघ आहेत. राज्यात एकूण ९ कोटी ६३ लाख मतदार आहेत. यातील महिला मतदारांची संख्या ४ कोटी ६६ लाख एवढी आहे तर पुरुष मतदारांची संख्या ४ कोटी ९७ लाख एवढी आहे. राज्यातील युवा मतदारांची संख्या १ कोटी ८५ लाख आहे. महाराष्ट्रातील नवमतदारांची संख्या २० लाख ९३ हजार आहे. 

राज्यात २०२४ च्या विधानसभा निवडणुकीसाठी १ लाख १८३ मतदान केंद्रांची स्थापना केली जाईल. यातील ४२ हजार ६०४ मतदान केंद्र शहरात तर ५७ हजार ५८२ मतदान केंद्र ग्रामीण भागात आहेत. राज्यातील महिला अधिकाऱ्यांची मतदान केंद्र ३८८ आणि नव अधिकाऱ्यांची मतदान केंद्र २९९ आहेत. महाराष्ट्रात २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान आहे. याआधी राज्यात १८ नोव्हेंबर २०२४ रोजी संध्याकाळी प्रचार थांबेल. 

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४

निवडणूक अधिसूचना २२ ऑक्टोबर २०२४
उमेदवारी अर्ज सादर करण्याचा शेवटचा दिवस २९ ऑक्टोबर २०२४
उमेदवारी अर्जांची छाननी ३० ऑक्टोबर २०२४
उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस ४ नोव्हेंबर २०२४
मतदान २० नोव्हेंबर २०२४
मतमोजणी २३ नोव्हेंबर २०२४
निवडणूक प्रक्रिया संपणार २५ नोव्हेंबर २०२४

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version