‘मी कुठल्याही नियमांचं उल्लंघन केलेलं नाही, जे बोललो ते कायद्याच्या चौकटीत’; विश्वास नांगरे पाटलांचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर

‘मी कुठल्याही नियमांचं उल्लंघन केलेलं नाही, जे बोललो ते कायद्याच्या चौकटीत’; विश्वास नांगरे पाटलांचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर

नागपूर : काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्यावर संघबाबत स्तुतीसुमनं उधळल्याची टीका केली होती. त्यांनी एक्स पोस्टद्वारे प्रतिक्रिया देत नांगरे पाटील यांच्या खरपूस समाचार घेतला होता. दरम्यान, त्यांच्या या टीकेला आज विश्वास नांगरे पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांनी नागपूरच्या पोलीस आयुक्तपदी बदली करण्यात आली असून आज त्यांनी पदभार स्वीकारला. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना नांगरे पाटील यांनी आपल्यावर झालेल्या टीकेला उत्तर दिले. 

हेही वाचा : Uddhav Thackeray: महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? ठाकरे-फडणवीस एकत्र येण्याच्या चर्चेवर उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य

काय म्हणाले आयपीएस नांगरे पाटील  

ज्या कार्यक्रमाबाबत बोलले जात होते, तो 19 एप्रिलचा कार्यक्रम आहे. त्यासाठी सानपाडा येथील कार्यकर्ते निमंत्रण घेऊन आले होते. त्यामध्ये अनेक प्रतिष्ठित नागरिक होते. GST संदर्भात मार्गदर्शन तिथे झाले, आध्यात्मिक मार्गदर्शन ही त्याठिकाणी काही तज्ञांनी केले. मी गेली 30 वर्ष पोलीस सेवेत आहे. मी रमजान ईदला जातो, जैन, शीख धर्माच्या कार्यक्रमात जातो, त्याच अनुषंगाने मी तिथेही गेलो होतो, असे स्पष्टीकरण नांगरे पाटील यांनी दिले. आम्ही इफ्तार पार्टीलाही जातो, त्याच मालिकेत मी याही कार्यक्रमात गेलो. त्यात मी मानवी कल्याणासाठीच्या सामूहिक प्रार्थना बोलून दाखविल्या. त्या भाषणामध्ये मी ज्ञानेश्वरीतील प्रार्थनाही बोलून दाखविली अमली पदार्थांच्या तरुणाईला होणाऱ्या हानीबद्दल देखील बोललो. त्याशिवाय पोलिस दलातील संधी बद्दल बोललो, त्यामुळे त्या (संघाच्या) कार्यक्रमात जाऊन कुठेही मी माझ्या नोकरीच्या सेवा शर्तीचे उल्लंघन केलेले नाही. ते क्रार्यक्रम वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला 150 वर्षे आणि आरएसएसला 100 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल होते. त्यामुळे मी कुठल्याही नियमाचे उल्लंघन केले असे वाटत नाही, असे नांगरे पाटील यांनी स्पष्ट केले. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version