Video: जवळ आल्यावर कळलं, जितेंद्र आव्हाड कामाचा माणूस – उद्धव ठाकरे

Video: जवळ आल्यावर कळलं, जितेंद्र आव्हाड कामाचा माणूस – उद्धव ठाकरे

“जितेंद्र आव्हाड यांना पूर्वी टीव्हीवर पाहायचो, बोलायचो काय हा बडबड करतोय? पण जवळ आल्यावर समजलं हा कामाचा माणूस आहे.” अशा शब्दांत आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आणि गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांचं कौतुक केलं. ते गिरणी कामगारांसाठी असणाऱ्या म्हाडाच्या सोडत कार्यक्रमाच्या वेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते गिरणी कामगारांसाठी म्हाडाच्या घरांची सोडत होती.  

गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या भाषणात ‘मुंबई आपल्यासाठी उपरीच राहिली’ अशा शब्दांत गिरणी कामगारांची खंत व्यक्त केली. “गिरणी कामगारांच्या घामातून उभी राहिलेली मुंबई कधी श्रीमंतांच्या खिशात गेली, कळलंदेखील नाही” अशा शब्दांत आव्हाड यांनी मुंबईकरांचं दुःख मांडलं.

उद्धव ठाकरे यांनी मागितलं गिरणी कामगारांकडून वचन

‘गिरणी कामगारांनो वचन द्या एकही घर तुम्ही विकणार नाही.’ असं वचन उद्धव ठाकरे यांनी गिरणी कामगारांकडून मागितलं.

‘गिरणी कामगार, मराठी माणूस शिवसेनेच्या ठाकरे कुटुंबांच्या हृदयातील माणूस आहे. 90 % मुंबई गिरणी कामगारांनी उभी केली आहे, हक्काने मिळवली आहे. संयुक्त महाराष्ट्राला यंदा 60 वर्ष पूर्ण होत आहेत, कित्येक लोकांनी संयुक्त महाराष्ट्रासाठी बलिदान दिले आहे, हे ऋण आहे त्याची मी परतफेड करत आहे.’ अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी गिरणी कामगारांचे आभार मानले.

‘गिरणी कामगार जर मुंबईत उपरा होणार असेल तर त्याचा काय उपयोग. सर्व पक्षांचे नेते गिरणी कामगारांच्या घरासाठी प्रयत्न करत आहेत. आजही जर गिरणी कामगारांच्या घरासाठी मोर्चे काढावे लागत असतील तर अगोदरच्या सरकारमध्ये व आपल्यात फरक काय?’ असा सवालही त्यांनी केला. तसंच एकही गिरणी कामगार घरापासून वंचित राहणार नाही, असं आश्वासनही दिलं.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version