भीमा कोरेगाव प्रकरणी पुन्हा केंद्र विरुद्ध महाराष्ट्र राज्य असा संघर्ष सुरू झाला आहे. भीमा-कोरेगाव प्रकरणाचा यापुढील तपास आता राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) करणार आहे. ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्र लिहून भीमा-कोरेगाव दंगलप्रकरणाच्या तपासासाठी SIT स्थापन करण्याची मागणी केली होती. मात्र केंद्र सरकारने तत्पूर्वीच हे प्रकरण NIA कडे सोपवून पवार यांना शह देण्याचा प्रयत्न केला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.