अनेक घरांमध्ये विविध देवी – देवतांचे फोटो सर्रास पाहायला मिळतात. आपापल्या मान्यतेनुसार प्रत्येक जण वेगवेगळ्या देवांची आराधना करतात. मात्र घरामध्ये कोणत्या दिशेला कोणत्या देवाचा फोटो लावावा, हे माहिती आहे का? यासाठीदेखील वास्तू शास्त्र आहे. प्रत्येक देवाच्या फोटोची जागा आणि दिशा ठरलेली असते. त्या दिशेला फोटो लावल्यास विशेष लाभ मिळतो. जाणून घेऊया काही देवी – देवतांच्या घरातील फोटोंची योग्य जागा आणि मिळणारा लाभ.
पंचमुखी हनुमानजी
फोटो कुठे लावाल – मुख्य प्रवेशद्वार किंवा दक्षिण दिशेची भींत
हा मिळेल लाभ – नजर बाधा किंवा नकारात्मक ऊर्जा निघून जाते. घरामध्ये सुरक्षा आणि शांती कायम राहते.
धावते घोडे
फोटो कुठे लावाल – पूर्व किंवा उत्तर दिशा
हा मिळेल लाभ – कामाला गती मिळेल. थांबलेली कामं सुरळीत सुरू होतील. आत्मविश्वास आणि धनसंपत्तीत वृद्धी होईल.
नाचणारा मोर
फोटो कुठे लावाल – पूर्व किंवा ईशान्य
हा मिळेल लाभ – घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आणि आनंदाचे वातावरण बनेल. मुलांचे लक्ष अभ्यासात लागेल. वातावरणात, विचारात मोकळेपणा आणि कल्पकता येईल.
राधा – कृष्ण
फोटो कुठे लावाल – बेडरूम किंवा पश्चिम दिशा
हा मिळेल लाभ – नात्यात जवळीक आणि विश्वास वाढेल. वैवाहिक जीवनात प्रेम आणि समजून घेण्याची क्षमता वाढेल.
भगवान कुबेर
फोटो कुठे लावाल – उत्तर दिशा
हा मिळेल लाभ – धन प्रवाह मजबूत होतो. अचानक लाभ आणि धन संपत्तीत वाढ होण्याची संधी मिळेल.
(Disclaimer : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही.)
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.