‘पक्ष मजबूतीसाठी काम करणार’

वसंत मोरे यांनी नुकताच शिउबाठात प्रवेश केला.
‘पक्ष मजबूतीसाठी काम करणार’

पुणे : वसंत मोरे यांनी नुकताच शिउबाठात प्रवेश केला. गुरूवारी उद्धव ठाकरे यांनी शिवगठबंधन बांधून त्यांचा शिवसेनेत प्रवेश केला. वसंत मोरे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. त्यावेळी वयाच्या अठराव्या वर्षीपासून शिवसैनिक आहे आणि एकतीस वर्षापर्यंत शिवसैनिकच होतो असे त्यांनी म्हटले आहे.

पुढे ते म्हणाले, लोकसभेच्या अगोदरच शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी संजय राऊत यांचीशी बोलणं झालं होतं. ज्याप्रमाणे आज उद्धव ठाकरे आणि शिउबाठा संघर्ष करत आहे. तो संघर्ष माझ्यासारख्या राजकीय संघर्ष करणाऱ्या कार्यकर्त्यांना आवडत असल्याने शिवसेनेत प्रवेश केला असल्याचे मोरे यांनी म्हटले आहे.  

वंचित सोडताना बाळासाहेब यांना माफ करा, माझ्या कार्यकर्त्यांसाठी मला विचार करावा लागेल असा मेसेज त्यांना प्रकाश आंबेडकरांना केला आहे. तसेच पक्ष संघटना आणि महानगरपालिकेत पक्ष मजबूत करण्याच्या दृष्टीनं शिवसैनिक म्हणून काम करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version