Vaibhav Naik: ‘भाजपने शब्द फिरवला म्हणूनच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले’; वैभव नाईकांचा मोठा खुलासा; नितेश राणेंवर केली सडेतोड टीका

नितेश राणे यांच्यावरही त्यांनी जोरदार टीका केली असून या वक्तव्यामुळे राज्यातील राजकारण पुन्हा तापण्याची शक्यता आहे.
Vaibhav Naik: ‘भाजपने शब्द फिरवला म्हणूनच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले’; वैभव नाईकांचा मोठा खुलासा; नितेश राणेंवर केली सडेतोड टीका

मुंबई: राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले असून, शिवसेना ठाकरे गटाचे नेते वैभव नाईक यांनी भाजपचे नेते नितेश राणे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.

नाईक यांनी भाजपावर बोलताना आरोप केला की, भाजपने दिलेला शब्द पाळला नसल्यामुळेच उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री व्हावे लागले. वैभव नाईक म्हणाले की, उद्धव ठाकरे हे स्वतःहून मुख्यमंत्री झाले नव्हते, तर परिस्थितीमुळे त्यांना ती जबाबदारी स्वीकारावी लागली. भाजपने सत्ता वाटपाबाबत दिलेला शब्द फिरवल्यानेच शिवसेनेने वेगळा निर्णय घेतला, असा दावा त्यांनी केला.

याचवेळी नितेश राणे यांच्यावर टीका करताना नाईक म्हणाले की, “नितेश राणे यांनी स्वतःचा पक्ष विसर्जित करून लाचारी स्वीकारत भाजपमध्ये पद मिळवले.” त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

हेही वाचा: Maharashtra Din : ‘देशाचं पावर हाऊस असलेला महाराष्ट्र देशाला दिशा दाखवत आहे’; महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांनी काढलो गौरवोद्गार

उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीचे समर्थन करत नाईक म्हणाले की, “उद्धव ठाकरे यांनी नेहमीच पक्षातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी दिली. त्यामुळेच आज अनेक सामान्य कार्यकर्ते मोठ्या पदांवर पोहोचले आहेत.” विधान परिषदेसाठी उमेदवारीची संधी असूनही उद्धव ठाकरे यांनी स्वतःऐवजी कार्यकर्त्यांना प्राधान्य दिले, असेही त्यांनी नमूद केले.

दरम्यान, वैभव नाईक यांच्या या आरोपांवर नितेश राणे काय प्रतिक्रिया देतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. या आरोप-प्रत्यारोपांमुळे राज्यातील राजकारणात आणखी तापमान वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा: Sureshkumar Jethlia: काँग्रेसमधून सुरुवात, नंतर अजितदादांची साथ; जालना जिल्ह्यात राष्ट्रवादीची ताकद वाढवणारा नेता काळाच्या पडद्याआड

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version