भाजप सरकारने कश्मीर मधील कलम 370 अमानुषपणे हटवलं – उर्मिला मातोंडकर

भाजप सरकारने कश्मीर मधील कलम 370 अमानुषपणे हटवलं –  उर्मिला मातोंडकर

भाजप सरकारने कश्मीर मधील 370 कलम अमानुषपणे हटवलं असल्याचं वक्तव्य अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी केलं आहे. 370 कलम हटवणं ही बाब फक्त आँफिशिअल असल्याचं मातोंडकरांनी म्हटलं आहे. मोदी सरकारने काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 रद्द केले आहे. त्यावर उर्मिलाने ही प्रतिक्रीया दिली आहे.

काय म्हणाल्या उर्मिला मातोंडकर

भाजप सरकारने कश्मीर मधील 370 कलम अमानुषपणे हटवलं असून 370 कलम हटवणं ही बाब फक्त आँफिशिअल असल्याचं मातोंडकरांनी म्हटलं आहे. मोदी सरकारने काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 रद्द केले आहे. त्यावर उर्मिलाने ही प्रतिक्रीया दिली आहे.

काश्मीर मध्ये माझे सासू सासरे राहतात त्यांना डायबिटीज आहे तसेच हाय ब्लड प्रेशरचा आजार आहे. माझं आणि माझ्या नवऱ्याचं त्यांच्याशी मागील बावीस दिवसापासून बोलणं झालं नाही. त्यांना आजारांचे औषध इंजेक्शन त्यांच्याकडे आहेत की नाही ते सुद्धा आम्हाला माहित नसल्याच उर्मिला म्हणाली आहे.

तसेच कश्मीरचा विकास व्हावा आणि लवकरात लवकर कश्मीर मधील कम्युनिकेशन सुरळीत करण्याची विनंती सुद्धा उर्मिला मातोंडकर यांनी सरकारकारला केली आहे. ऊर्मिला मातोंडकर नांदेडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version