सार्वजनिक ठिकाणी अश्लीलता पसरवल्याचा आरोप करत उर्फीविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र तिच्यावर आतापर्यंत कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही. भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फी जावेदला बेड्या घालण्याची मागणी केली होती. चित्रा वाघ यांनी ट्विट करत उर्फी जावेदवर निशाणा साधला होता. याला उर्फीने देखील उत्तर दिलं होतं. उर्फी जावेदने यानंतर आता पुन्हा एकदा चित्रा वाघ यांची खिल्ली उडवली आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. “मेरी डीपी डीपी इतनी ढासू, चित्रा मेरी सासू” असं या ट्विट मध्ये तिने म्हटलं आहे. काही दिवसांपूर्वी देखील तिने चित्रा वाघ यांना डिवचलं होतं. “आपण लवकरच मैत्रिणी होऊ चित्रूsss” असं म्हटलं होतं.
Meri dp itni dhaasu, Chitra Meri saasu — Uorfi (@uorfi_) January 9, 2023
मला ट्रायल किंवा हा मूर्खपणाच नको आहे. जर तुम्ही तुमची आणि तुमच्या कुटुंबीयांची संपत्ती जाहीर केली तर मी जेलमध्ये जाण्यास तयार आहे. एक राजकारणी किती आणि कुठून पैसा कमावतो हे आधी जगाला सांगा. वेळोवेळी तुमच्या पार्टीतील काही पुरुष कार्यकर्त्यांवर शोषणाचे आरोप झाले आहेत. याविषयी तुम्ही कधीच काही करताना दिसल्या नाहीत” असं उर्फीने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
उर्फीने चित्रा वाघ यांना यासोबतच एक सल्ला देखील दिला आहे. “माझ्याकडे तुमच्यासाठी एक चांगली कल्पना आहे. मानवी तस्करी आणि सेक्स ट्रॅफिकिंग यांसारख्या घटना अजूनही मुंबईत घडत आहेत, त्याबद्दल तुम्ही काहीतरी करण्याचा विचार करा. अनधिकृत डान्स बार बंद करा, जे अजूनही चालू आहेत” असं तिने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. चित्रा वाघ यांनी मुंबईचे आयुक्त तसेच सहआयुक्त कायदा व सुव्यवस्था यांची भेट घेऊन उर्फीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. “उर्फी जावेद रूपी स्त्री देहाचा बाजार रोखा”, अशा विषयाचे पत्र लिहून उर्फीच्या अश्लील कृत्याला आळा घाला असे चित्रा वाघ यांनी म्हटले.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.