बळीराजावर अवकाळीचं संकट

बळीराजावर अवकाळीचं संकट

उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात बुधवार, गुरुवार व शुक्रवारी अवकाळी पावसाने विजांसह पावसाने धुडगूस घातल्याने सिन्नर तालुक्यात विशेष करून पश्चिम भागातील कोनांबे सोनांबे यास अनेक परिसरात शुक्रवारी साडेतीन वाजता दुपारी अनेक ठिकाणी पावसाने तडाखा दिल्याने शेतकरी राजावर मोठे संकट ओढवले आहेत.

सलग ४ दिवस मराठवाड्यात अवकाळी पाऊस पडल्याने २१ जनावरांचा मृत्यू झाला आहे. तर, वीज पडून ४ जणांचा मृत्यू, २२ जण जखमी झाले आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आज देखील पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. काही ठिकाणी मुसळधार तर काही ठीकामी रिमझिम पावसाने हजेरी लावली आहे. तर सोयगाव तालुक्यात जोरदार वाऱ्यासह गारांचा पाऊस पडल्याचे पाहायला मिळाले. तर अजिंठा लेणी परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे अक्षरशः लेणीमधील धबधबे ओसंडून वाहत होते. त्यामुळे लेणी परिसरातील नदीला पूर आल्याचे देखील पाहायला मिळाले. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version