मुंबईसह उपनगरात अवकाळी पाऊस

मुंबईसह उपनगरात अवकाळी पाऊस

उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्याला अवकाळी पावसाने गेल्या काही दिवसांपासून झोडपलं आहे. आता या अवकाळी पावासाची मुंबईत एन्ट्री झाली आहे. मुंबईसह उपनगरांमध्ये, ठाण्यात आणि कल्याण डोंबिवली मंगळवार पहाटेपासून जोरदार पाऊस सुरू आहे. दक्षिण मुंबईसह मुंबईच्या पश्चिम आणि पूर्व उपनगरात पाऊस सुरू आहे. मुलुंड, विक्रोळी, अंधेरीत पाऊस सुरू आहे.

मुंबईसह आजूबाजूच्या ठाणे आणि कल्याण डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूरमध्ये रात्रीपासून ढग दाटले होते. यानंतर मुंबई पहाटे साडेपाच वाजेपासून पाऊस सुरू झाला. मुंबईजवळ असलेल्या वसई-विरार पट्ट्यातही पाऊस पडला आहे. अवकाळी पावसाने महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाला झोडपल्यानंतर आता राज्याची आणि देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला अवकाळी पावसाचा फटका बसतो आहे. या पावसाचा फटका सकाळी सकाळी कामावर जाणाऱ्या चारकरमान्यांना बसला आहे. अचानक सुरू झालेल्या पावसामुळे अनेकांची तारांबळ उडली आहे. सध्यातरी उपनगरीय लोकल ट्रेनची वाहतूक सुरळीत सुरू आहे.

आधीच मुंबईसह जवळपासच्या उपनगरांमध्ये संसर्गजन्य आजारांच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. अशातच अवकाळी पावसामुळे आजाराचा प्रादुर्भाव वाढण्यास पोषक वातावरण निर्माण झालं आहे. यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version