केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना कोरोनाची लागण

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना कोरोनाची लागण

देशासह राज्यातील अनेक राजकीय नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनासुद्धा कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. नितीन गडकरी यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्ण संख्या वाढत आहे. अशातच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती त्यांनी ट्विट करत दिली आहे. तसेच संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी करून घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

नितीन गडकरी यांची प्रकृती उत्तम असून त्यांना कोरोनाची सौम्य लक्षणे जाणवत आहेत. तसेच सध्या ते गृहविलगीकरणात असून त्यांच्या उपचार सुरू आहेत.

काही दिवसांपूर्वी केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि भाजपचे अध्यअक्ष जे.पी. नड्डा यांना कोरोनाची लागण झाली होती. आणि त्यांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना कोरोनाची लागणी झाली असून संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी करण्याचे आवाहन गडकरी यांनी केली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version