रशिया-युक्रेन युद्धाचा आज २३वा दिवस आहे. तर रशियाने आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा आदेश झुगारून रशियावर युद्ध सुरूच ठेवले. दरम्यान, रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यात युक्रेनची अभिनेत्री ओक्साना श्वेत्स हीचा मृत्यू झाला आहे. रशियाचे अभिनेत्रीच्या राहत्या इमारतीवर क्षेपणास्त्र हल्ला केल्यामुले या अभिनेत्रीचा मृत्यू झाला आहे.
युक्रेनमधील अभिनेत्री ओक्साना श्वेत्स यांचा रशियाने केलेल्या रॉकेट हल्ल्यात मृत्यू झाला आहे. ओक्साना या युक्रेनची राजधानी कीवमध्ये राहत होत्या. त्या राहत असलेल्या इमारतीवर रशियाने क्षेपणास्त्र हल्ला केला. या हल्ल्यात अभिनेत्री ओक्साना यांचा मृत्यू झाला आहे.
ओक्साना श्वेत्स या ६७ वर्षांच्या होत्या. युक्रेनच्या सर्वोच्च कलात्मक सन्मानांपैकी एका पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले होते. ओक्साना यंग थिएटर ग्रुपचा भाग होती.
रशियाने युक्रेनच्या अनेक नागरी वस्तींवर हल्ले केले असून अनेक शहरे उद्ध्वस्त केली आहेत. तर रशियाने हे युद्ध थांबवण्याचे आंतरराष्ट्रीय न्यायालयाने आदेश दिले होते. मात्र, रशियाने आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा आदेश झुगारून २३व्या दिवशीही युद्ध सुरूच ठेवले.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.