साईचरणी उद्धव ठाकरे

साईचरणी उद्धव ठाकरे

सत्तासंघर्षाचा निकाल लागल्यानंतर उद्धव ठाकरे हे १२ मे रोजी अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर गेले आहेत. यादरम्यान त्यांनी शिर्डीतील साई मंदिरात सहपत्नीक दर्शन घेतले.

या दौऱ्यावर असताना त्यांनी आधी शनिशिंगणापूर येथे शनिदर्शन घेतले. त्यानंतर इतर काही कार्यक्रमांना हजेरी लावून शिर्डीतील साईंचे दर्शन घेतले. उद्धव ठाकरे यांनी या दौऱ्याच्या सुरूवातीला सोनई येथील आमदार शंकरराव गडाख यांच्या निवसस्थानी जाऊन ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी आज ८० व्या वर्षात पदार्पण केलं असं म्हणत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. याबद्दल त्यांनी ट्वीट करत माहिती दिली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version