‘…म्हणून आम्हाला फटके पडले’, उद्धव ठाकरेंची कबुली

‘…म्हणून आम्हाला फटके पडले’, उद्धव ठाकरेंची कबुली

राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महत्त्वाची कबुली विधानसभेत दिली. या कबुलीद्वारे भाजपला सूचक इशारा मुख्यमंत्र्यांनी देत शिवसेनेचं राजकारण आता बदलणार असल्याचीच सुरुवात त्यांनी यातून दिली आहे.

काय म्हणाले मुख्यमंत्री ठाकरे?

‘शेवटी जनादेश हे राजकारण आहे. या राजकारणात कदाचित आम्ही चुकत होतो. धर्म आणि राजकारण आम्ही इतकी वर्षं एकत्र करत होतो, त्याचेच फटके कुठे तरी आम्हाला पडले.’ अशी कबुली मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. ‘राजकारण हा जुगार असल्याचा आम्हाला विसर पडला होता. जुगार हा जुगारासारखाच खेळायचा असतो. मात्र ते विसरून आम्ही धर्म आणि राजकारण एकत्र करत होतो.’ अशी कबुलीही उद्धव ठाकरे यांनी यावेळी बोलताना दिली.

आम्ही धर्मांतर केलेलं नाही’   

धर्म आणि राजकारण एकत्र केल्याचे फटके पडल्याचं जरी मुख्यमंत्र्यांनी म्हटलं असलं, तरी धर्मासंदर्भात एक महत्त्वाची पुस्ती त्यांनी जोडली. आम्ही धर्मांतर केलेलं नाही. आम्ही कालही हिंदू होतो, आजही आहोत आणि उद्याही राहू असं मुख्यमंत्र्यांनी ठणकावून सांगितलं. मात्र सरकार चालवताना किमान समान कार्यक्रम हाती घ्यावा लागतो, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

अनेक वर्षं ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या शिवसेनेने भाजपाची साथ सोडून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीने राज्यात सरकार स्थापन केल्यानंतर शिवसेनेची वाटचाल कोणत्या दिशेने होणार, याचाच इशारा मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यातून मिळाला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version