पुणे : पक्षाच्या मेळाव्यात बोलताना उद्धव बेताल बोलले. त्यांनी काही दिवसांपूर्वी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी आक्षेपार्ह भाषा वापरली होती. ‘विधानसभेनंतर मी राहीन किंवा फडणवीस’ असेही ते म्हणाले होते. आता आणखी एक पाऊल पुढे टाकत उद्धव यांनी थेट केंद्रीय गृहमंत्र्यांना उद्देशून आक्षेपार्ह भाषा वापरली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना अहमदशाह अब्दालीचे वंशज म्हणण्यापर्यंत उद्धव यांची मजल गेली. त्यांनी पुण्यात बोलताना भाजपाला आव्हान दिले.
उद्धव यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे
लढाई मैदानात होणार – उद्धव
हॉलमध्ये लढाई होणार नाही – उद्धव
मी कुणालाही आव्हान देत नाही – उद्धव
फडणवीसांना आव्हान दिलं नाही – उद्धव
तेव्हाची आणि आताची लढाई वेगळी – उद्धव
जनता न्यायाधीश आहे – उद्धव
जनतेच्या न्यायालयात लढाई – उद्धव
सत्तेसाठी माणसं तोडता ते चालतं का ? – उद्धव
इतरांची घरं जाळणं शिवरायांनी शिकवलं नाही – उद्धव
धर्माला पुढे नेणारं आमचं हिंदुत्व – उद्धव
विश्वासघात करणारे हिंदू नसतात हे शंकराचार्य म्हणाले – उद्धव
पक्ष चोरले जात आहेत – उद्धव
सत्तेसाठी वाटेल ते करता तो सत्ताजिहाद आहे – उद्धव
मुंबई, पुण्यासह कोकणातील रस्त्यांवर खड्डे – उद्धव
मुंबई – गोवा महामार्गावर अद्याप खड्डे – उद्धव
खड्डापुरुष हा पुरस्कार द्या – उद्धव
राम मंदिरापाठोपाठ संसदही गळतेय – उद्धव
तीन महिन्यांनी कंत्राटदाराचा हिशोब मांडणार – उद्धव
कंत्राटदार माझा लाडका – उद्धव
पुणे वाचवण्यासाठी जिंकायचं आहे – उद्धव
भराव टाकल्याने नदीचे पाणी बाहेर – उद्धव
भराव टाकून नदीचा प्रवाह बदलला – उद्धव
पुण्याचा शाश्वत विकास करायचा आहे – उद्धव
पुण्यातील पूर हा एका विभागाचा नाही – उद्धव
मी म्हणजे संस्कारी महाराष्ट्र – उद्धव
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.