आज राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पात शेतकरी, उद्योग, गेमिंग अशा क्षेत्रासाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या. याचवेळी शेतकरी कर्जमाफीची घोषणा करण्यात आली. या अर्थसंकल्पात त्यांनी शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा केली आहे. पात्र शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी मिळणार आहे.
तसेच जे शेतकरी नियमितपणे कर्ज भरतात त्यांना प्रोहत्साहन पण 50 हजार रुपयांचा लाभ दिला जाणार आहे. या अर्थसंकल्पावर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे, त्यांनी यावर बोलताना सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
एकूण जर अर्थसंकल्प पाहिला तर सातबारा कोरा झालेला नाहीचये, लाडक्या बहिणीना 2100 रुपये देणार होते, त्याचा कुठे उल्लेख नाहीये. ठेकेदारांसाठी मात्र ठोस योजना आहेत, अगदी डिटेलमध्ये मार्ग कुठून कुठपर्यंत होणार आहे? त्यासाठी किती कोटी खर्च हे अगदी डिटेलमध्ये सांगितलं आहे, त्यामुळे या अर्थसंकल्पामध्ये ठेकेदारांसाठी ठोस अशा योजना आहेत, मात्र शेतकरी आणि कामगारांसाठी हा फसवा अर्थसंकल्प आहे.
पुढे ते म्हणाले की, पुढे बोलताना ते म्हणाले की, मला असं वाटतं की राज्याची आर्थिक परिस्थिती कशी आहे? हे सर्व जण जाणत आहेत. कर्ज काढून फटाके वाजवणारा हा अर्थसंकल्प आहे. त्यामुळे मला नाही वाटत की त्यामधून राज्याचं काही हीत साधलं जाईल.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.