मी मुख्यमंत्री असेन, तर जनतेचे प्रश्न सोडवणं हे माझं काम आहे – उद्धव ठाकरे

मी मुख्यमंत्री असेन, तर जनतेचे प्रश्न सोडवणं हे माझं काम आहे – उद्धव ठाकरे

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबत ओबीसी, भटके विमुक्त, धनगर, कुणबी, वंजारा, तेली, माळी, आगरी आदी समाजाच्या नेत्यांची महत्वाची बैठक आणि पत्रकार परिषद रंगशारदा, बांद्रा येथे पार पडली. विविध समाजाचे प्रतिनिधी बैठक आणि पत्रकार परिषदेला हजर होते. वेगवेगळ्या समाजात विखुरलेले शिवाजी महाराजांचे मावळे पुन्हा एकत्र आले आता इतिहास घडणार नाही तर आम्ही घडवणार आहोत.

काय म्हणाले उद्धव ठाकरे ?

ऐन लढाईच्या वेळी जे सोबत येतात तेच खरे सोबती आणि साथी असतात. तिकीट वाटपाची चर्चा असताना तुम्ही नाही आलात, तुम्ही सर्व झाल्यानंतर आलात यातच तुमचा निस्वार्थीपणा दिसतोय.समाजाच्या भल्याची मागणी तुम्ही केलीये ते पूर्ण करण्याचं काम आम्ही करु, वेगवेगळ्या समाजात विखुरलेले शिवाजी महाराजांचे मावळे पुन्हा एकत्र आले. आता इतिहास घडणार नाही तर आम्ही घडवणार आहोत.

तुमच्या अन्न,वस्त्र, निवारा या मागण्या पूर्ण करण्यासाठी मी स्वतः प्रयत्न करेन. तुमच्यामुळे विजय निश्चित झालाय, तुमच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी तुम्ही पाठपुरावा करु नका तो मी करेल. निवडणूक म्हणजे लोकशाहीच युद्ध आहे. युद्धात आपण सगळे उतरुयात असे ही ते म्हणाले आहेत.

आधीचं आमचं सरकार म्हणजे सरमिसळ होती, मात्र आता आम्ही ठरवून एकत्र आलोत कायदेशीर बाबींची पूर्तता केली प्रश्न सोडवण्याचा जास्त प्रयत्न करू समजा मी मुख्यमंत्री असेल तर जनतेचे प्रश्न सोडवणं हे माझं काम आहे. सत्तेत राहून विरोध करणारा शिवसेना हा एकमात्र पक्ष आहे. धनगर समाजाला आरक्षण देणार म्हणजे देणार कायदेशीर मार्गाने होत नसेल तर अन्य संविधानिक मार्गाने ते देऊ असे अश्वासन उद्धव ठाकरे

आरे हा स्वतंत्र विषय आहे, त्यावर मी रोखठोक बोलेल, त्यावर स्वतंत्र बोलेल, सरकार आल्यानंतर झाडांचे खुनी जे असतील त्यांना पाहून घेईन. आरे विषयी बोलताना ते असे म्हणाले आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version