‘महाविकासआघाडी सरकार आणण्यात शरद पवारांचा चमत्कार आहे’, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीरपणे कबूल केलं. पुण्यात ‘वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट’च्या पारितोषक वितरण समारंभात ते बोलत होते. सत्तास्थापनेनंतर प्रथम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार एका मंचावर उपस्थित होते. यावेळी भाषणादरम्यान उद्धव ठाकरेंनी भाजपला टोला लगावला.
आम्ही सत्तेत अर्धवट होतो. तेव्हाचे निर्णय हे बोलाचा भात आणि बोलाची कढी होती, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी आधीच्या सरकारला चिमटा काढला.
मी मुख्यमंत्री पदावर नवीन आहे. मला सगळेच समजून घेतायत. हर्षवर्धन पाटील देखील मला अनेक गोष्टी समजावून सांगतात, असे देखील मुख्यमंत्री म्हणाले.
इथे कमी जागेत जास्त उत्पादन घ्यायच पवार साहेब शिकवतात. दुसरीकडे कमी आमदारांच्या जागेत सरकार कसं बनवायच शिकवलं.
शेतकरी कर्जमुक्त झालाच पाहिजे. शेतकऱ्यांचा पाठीराखा म्हणुन सरकार काम करेल, असा शब्द मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला.
शेतकरी हा आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे, असे देखील मुख्यमंत्री म्हणाले.
या कार्यक्रमाला संस्थेचे उपाध्यक्ष दिलीप वळसे पाटील, बाळासाहेब थोरात, अजित पवार उपस्थित होते.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.