Uddhav Thackeray : ‘हा गद्दार जिकडे दिसेल तिकडे…’; ठाकरेंनी केली गद्दारांना गाडायची भाषा, बंडखोर खासदारांच्या मतदारसंघात ठाकरेंचा दौरा

Uddhav Thackeray : ‘हा गद्दार जिकडे दिसेल तिकडे…’; ठाकरेंनी केली गद्दारांना गाडायची भाषा, बंडखोर खासदारांच्या मतदारसंघात ठाकरेंचा दौरा

यवतमाळ : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांनी नुकताच शिंदे सेनेत प्रवेश केला असून या बंडखोर खासदारांच्या मतदारसंघात आजपासून उद्धव ठाकरे यांनी दौरा सुरू केला आहे. या निमित्ताने उद्धव ठाकरे यांचा निष्ठावंत शिवसैनिक संवाद मेळावा नुकताच यवतमाळच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये संपन्न झाला. या मेळाव्याला दूरवरून कार्यकर्त्यांची उपस्थिती दिसून आली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी यवतमाळ वाशिम लोकसभेचे खासदार संजय देशमुखसह इतर पाच गद्दारांचा खरपूस समाचार घेतला. खासदार फुटले म्हणून पक्ष संघटना स्थानिक पातळीवर कमकुवत होऊ नये, शिवसैनिकांचं खच्चीकरण होऊ नये, त्यांच्यामध्ये विश्वास टिकून रहावा, यासाठी उद्धव ठाकरे फुटलेल्या खासदारांचे सहाही मतदारसंघ पिंजून काढणार आहेत. 

हेही वाचा : Ketan Agrawal Case: ’17 कोटींचं लग्न, चार्टर्ड विमानं सगळं खोटं’; सियाच्या वडिलांचा धक्कादायक खुलासा, ‘माझी ऐपत…

आज यवतमाळ येथे झालेल्या सभेत बोलताना उद्धव ठाकरेंनी फुटलेल्या खासदारांचा समाचार घेतला. संजय देशमुखांवर टीका करताना ठाकरे म्हणाले की, ‘दोन आठवड्यांपूर्वी खासदारांची बैठक घेतली. ते म्हणाले मला मुलीची सोयरीक जुळवायची आहे. व्हिडिओ कॉलवरून हजर राहतो. मला काय माहीत मुलीची सोयरिक जुळवत होते की स्वःताची सोयरीक जुळवत होते. मी रात्री फोन केला. जुळलं का. हो म्हणाले. जुळलं दोन दिवसाने कळलं. गेले सासरी, आता नांदा तिकडे, गद्दाराच्या कळपात नांदा. इथे वाघाचं जीवन जगत होते. तिकडे गाढवाचं जीवन जगा.

तर भाजपवरही जोरदार हल्लाबोला केला. अयोध्येत राम मंदिरात दान चोरीचा प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी उत्तर प्रदेश सरकारने SIT नेमली असून कारवाई सुरु आहे. याच मुद्यावरुन उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला. “हिंदुंना जागृती आली पाहिजे. आजचा सामनातील अग्रलेख वाचा. मध्ये मध्ये मोर्चा काढणारे झोपले आहेत का? सकल हिंदू समाज वाले कुठे आहेत?. भाजपमुक्त राम पाहिजे. आम्ही त्यासाठी आंदोलन करणार आहोत. या विळख्यातून रामाला सोडवण्यात येणार आहे. भोंदूंपासून सोडवणार आहोत. शिवसेना पहिली ठिणगी महाराष्ट्रात टाकेल” अशी घोषणा उद्धव ठाकरे यांनी यवतमाळमध्ये केली. त्यांनी निष्ठावंत शिवसैनिकांच्या मेळाव्याला संबोधित केलं

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version