Omraje Nimbalkar and Uddhav Thackeray : मातोश्रीवरून ओमराजेंना फोन! उद्धव ठाकरेंशी बोलताना निंबाळकर भावूक; म्हणाले, "मी कुठलाही निर्णय घेतलेला नाही…"

ओमराजे निंबाळकरांची नेमकी भूमिका काय आहे, हे समजून घेण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी स्वतः ओमराजे निंबाळकर यांना फोन केला आहे.
Omraje Nimbalkar and Uddhav Thackeray : मातोश्रीवरून ओमराजेंना फोन! उद्धव ठाकरेंशी बोलताना निंबाळकर भावूक; म्हणाले, "मी कुठलाही निर्णय घेतलेला नाही…"

राज्यभरात ऑपरेशन टायगरची चर्चा जोरदार सुरु असताना पुण्यात मात्र भर पहाटे ठाकरेंकडून ओमराजेंच्या मनधरणीचे नाट्य पाहायला मिळाले. एवढचं नव्हे तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते कैलास पाटील आणि वरुण सरदेसाई यांनी आज खासदार ओमराजे निंबाळकर यांची भेट घेतली. यावेळी तिघांमध्येही मध्यरात्री तब्बल एक तास चर्चा झाल्याचे समोर आले आहे. यामुळे या प्रकरणाला एक अतिशय मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे. 

तर दुसरीकडे ओमराजे निंबाळकर हे धाराशिवकडे बैठकीसाठी आपल्या ताफ्यासोबत निघाले असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यात फोनवरुन बोलणे झाल्याची माहिती आहे. ओमराजे निंबाळकर यांचे नेमकं म्हणणं काय आहे हे उद्धव ठाकरेंनी समजून घेतले. "मी पक्षासोबतच आहे आणि सध्या कोणताही वेगळा निर्णय घेतलेला नाही. आज मी जे काही आहे, पहिली निवडणूक लढवून आमदार झालो आणि आता तीन वेळा खासदार आहे, ते केवळ पक्षामुळे आणि तुमच्यामुळेच आहे. तुम्हीच मला राजकारणात मोठं केलं. स्थानिक पातळीवरील परिस्थिती आणि पुढील वाटचालीबाबत मी आधी माझ्या सर्व सहकाऱ्यांशी आणि कार्यकर्त्यांशी सविस्तर चर्चा करणार आहे." असं म्हणत ओमराजे निंबाळकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. 

हेही वाचा- Akhil Chitre on Amit Shah: "शिंदे सेना ही भाजपची 'टेस्ट ट्यूब बेबी'" अमित शाहांच्या 'त्या' विधानावर ठाकरे गटाकडून जोरदार पलटवार

त्यामुळे फोन कॉलवर ओमराजे निंबाळकर यांनी आपण अजूनही ठाकरे गटासोबत असल्याचे स्पष्ट केले आहे. यावेळी त्यांची नेमकी भूमिका काय आहे, हे समजून घेण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी स्वतः ओमराजे निंबाळकर यांना फोन केला. मात्र, आज सायंकाळी धाराशिवमध्ये कार्यकर्त्यांसोबतच्या बैठकीनंतर ओमराजे नेमकी काय अधिकृत भूमिका मांडतात, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. 

ओमराजेंना न्यायालयीन लढाईत धक्का
गेल्या दोन दशकांपासून संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेणारा पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा निकाल अखेर शनिवारी जाहीर झाला. मात्र, या निकालामुळे निंबाळकर कुटुंबीयांना मोठा कायदेशीर धक्का बसला आहे. अनेक वर्षांच्या प्रदीर्घ संघर्षानंतर आणि कायदेशीर लढाईनंतर न्यायालयाने या खटल्यातील सर्व आरोपींची निर्दोष सुटका केली आहे. हा निकाल ओमराजे आणि त्यांच्या परिवाराच्या अपेक्षेच्या पूर्णपणे विपरीत लागल्याचे दिसून येत आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version