‘हिंमत असेल तर समोर या’

नागपूर येथून उद्धव यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला.
‘हिंमत असेल तर समोर या’

नागपूर : नागपूर येथे शिउबाठाची सभा होती. यावेळी उद्धव ठाकरेंनी भाषण केले. या सभेत बोलताना रामटेक हा आपला बालेकिल्ला आहे. मशालीने आता अंधार दूर करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

मालवण येथील पुतळा प्रकरणी बोलताना ते म्हणाले मालवणमधील घटना देशासाठी लाजीरवाणी गोष्ट  आहे. शिवरायांचा पुतळा उभारतानाही स्टील वापरण्याऐवजी लोखंड वापरलं तुम्ही पैसे खाल्लेत असं म्हणत त्यांनी विरोधकांवर ताशेरे ओढले.   
 

पुढे उद्धव ठाकरे म्हणाले, अमित शाहांनी बंद दाराआडचे धंदे सोडावे. हिंमत असेल तर समोर या आवाहन असे त्यांनी अमित शाहांना केले आहे. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version